नवापूर तालुक्यात मुसळधार पाऊस; ४०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले, शाळांना सुट्टी जाहीर

नवाबपूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे.
Nandurbar Nawabpur Rain
Nandurbar Nawabpur RainSaam Tv

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. पावसामुळे नवापूर शहरातील रंगावली नदीपात्रातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. तसेच पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने पाणी पातळीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नदी काठच्या नागरिकांच्या संरक्षणाच्या हेतूने नागरिकांचे स्थलांतर करण्याचे निर्णय नवापूर तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी घेतला आहे. (Nandurbar Rain Updates)

Nandurbar Nawabpur Rain
Weather Update : राज्यात पावसाचा जोर वाढणार; मुंबई-पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अलर्ट

नदीकाठी राहणाऱ्या सर्व नागरिकांना आपले मौल्यवान सामान, महत्वाचे कागपत्रे, तसेच अन्य महत्वाचे साहित्यांसह सार्वजनिक हॉल, शासकीय विश्रामगृह या ठिकाणी स्थलांतरित व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आवश्यकतेनुसार नगरपालिका टाऊन हॉल, अग्रवाल भवन आणि हनुमान वाडी या ठिकाणी नागरिकांची सोय करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाद्वारे देण्यात आली आहे.

शाळांना सुट्टी जाहीर

नवापूर तालुका तहसीलदार मंदार कुलकर्णी व शिक्षणाधिकारी यांनी नवापूर तालुक्यातील सर्व शाळा प्रशासन आस्थापनांना सुट्टी देण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. नवापूर तालुक्यात गेल्या पाच दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून अनेक गावांचे फरशी पूल वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसाचा जोर कमी होईपर्यंत पुढील आदेशापर्यंत शाळांना सुट्टी राहणार असल्याचे सर्व केंद्रप्रमुखांना तोंडी आदेश देण्यात आले आहे. (Nandurbar Latest News)

Nandurbar Nawabpur Rain
Weather Updates : नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट; पहिले ते बारावीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर

नवापूर शहराला लागून असलेल्या रंगावली नदी काठावरील जुने महादेव मंदिर परिसर, राजीव नगर परिसर व देवळफळी परिसरातील साधारण १०० घरातील ४०० व्यक्तीना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात येत असल्याची माहिती नवापूर तालुका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. नागरिकांनी नदी - पूर पाहण्यासाठी नदीकिनारी जाऊ नये, आपली सुरक्षितता बाळगावी असे आवाहान तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी केले आहे.

नवापूर तालुक्यात गेल्या पाच दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून आतापर्यंत २० घरांची पडझड व दोन गोठ्याचे नुकसान झाले आहे. अद्याप कोणतीही जीवित हानी झालेली नसल्याची माहिती तालुका प्रशासनाने दिली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com