Sindhudurg : माणगाव खोऱ्यातील 27 गावांचा संपर्क तुटला; आंबोली नांगरतास इथं टस्कर हत्तीची दहशत

गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे.
sindhudurg
sindhudurgsaam tv
Published On

- विनायक वंजारे

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं (rain) धुमाकुळ घातला आहे. या पावसामुळं शेतीचे पुन्हा एकदा नुकसान हाेत आहे. पूराच्या पाण्यामुळं काही गावांचा संपर्क तुटत आहे. तसेच टस्कर हत्ती शेतात घुसल्याने त्यांची दहशत आता वेगळीच म्हणावी लागेल.

माणगाव खोऱ्यातील 27 गावांचा संपर्क तुटला

कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे 27 गावांना जोडणारे आंबेरी पूल पाण्याखाली गेले आहे. निर्मला नदीला पुर आल्यामुळे माणगाव खोऱ्यातील 27 गावांचा संपर्क तुटला आहे. तर आंबेरी पुलावर गाड्या अडकून वाहतूक ठप्प झाली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

sindhudurg
गणपती चालले गावाला...; आज शंभरपेक्षा अधिक मंडळं देणार 'बाप्पा' स निराेप

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ माणगाव खोऱ्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. माणगाव खोऱ्यातील तब्बल 25 ते 30 गावांमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मोरे येथील स्वप्ननगरी अपंग आश्रम जवळील पुलावर पाणी आल्यामुळे हा पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे निळेली व मोरे गावाकडे जाणारी वाहतूक टप्प झाली आहे. आज पहाटेपासून मोठ्या प्रमाणात पाऊस या भागात कोसळत आहे. या भागातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत.

टस्कर हत्तीची दहशत

चंदगड, आंबोली परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टस्कर हत्तीने आंबोली (amboli) नांगरतास येथे भर रस्त्यात पुन्हा दर्शन दिल्याने वाहन चालकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुमारे १० मिनिटे टस्कर या रस्त्यावर ठाण मांडून होता. यावेळी रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ नव्हती. गाड्यांची वर्दळ वाढल्यानंतर टस्कराने नजिकच्या झाडीत आश्रय घेतला. गेले काही दिवस या परिसरात टस्कराने धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांच्या बागायतीचे अतोनात नुकसान केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com