Rain Update : आठवडाभरानंतर पावसाची हजेरी; गडचिरोली, भंडारा, नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पाऊस

Gadchiroli Nandurbar News : श्रावण महिन्याला सुरवात झाल्यानंतर म्हणजे पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली असल्याने शेतकरी चिंतेत होता. पिके कोमेजू लागल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागून होत्या.
Rain Update
Rain UpdateSaam tv
Published On

Rain Update : पंधरा दिवसांपूर्वी राज्यात सर्वदूर झालेल्या जोरदार पावसानंतर आठवडाभरापासून पावसाने विश्रांती घेतली होती. यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. दरम्यान आठवडाभराच्या विश्रांतीनंतर राज्यातील काही भागात पावसाचे आगमन झाले आहे. यात गडचिरोली, भंडारा व नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याचे पाहण्यास मिळाले. मात्र अनेक भागात पावसाची प्रतीक्षा आहे. 

गडचिरोली जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी

गडचिरोली जिल्ह्यात आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर अखेर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. आजच्या पावसामुळे सर्वात जास्त फायदा शेतकरी बांधवांना मिळणार आहे. आठवडाभरापासून पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडलेला होता. मात्र आजच्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे.

Rain Update
Prakash Ambedkar : पंधरा दिवसात देशाच्या राजकारणात नवीन बातमी; प्रकाश आंबेडकर यांचा शरद पवारांबाबत खळबळजनक दावा

भंडारा जिल्ह्यातही दमदार हजेरी
भंडारा : भंडारा जिल्ह्यात आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर अखेर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्यामुळे धान पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे. तर उकाड्यापासून हैराण झालेला नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे. पावसाने आठवडाभरापासून दडी मारल्यामुळे शेतकरी संकटात चिंतेत होता. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात आज पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी शेतात लावलेल्या धानाला यामुळे फायदा होणार आहे.

Rain Update
Nagpur Crime : दारूच्या व्यसनाने वडिलांचा मृत्यू; संतापातून मुलगा बनला चोर, वाईन शॉप केले टार्गेट

दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर नंदुरबार जिल्ह्यात पाऊस 

नंदुरबार जिल्ह्यात देखील मागील अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. कडक ऊन पडत असल्याने शेतातील पिके देखील कोमेजू लागली होती. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होते. दरम्यान आज सातपुड्याचा अक्राणी परिसरात मुसळधार पाऊस झाला. पाऊस अभावी तयार झालेल्या दमट वातावरणापासून सुटका मिळणार असून अचानक आलेल्या पावसामुळे बाजारासाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com