आरोग्य विभागाच्या परीक्षा सुरळीतपणे पार : डॉ. पाटील

सार्वजनिक आरोग्य विभागातील गट ड संवर्गातील एकूण ३४६२ पदे भरण्यासाठीची लेखी आज सुरळीतपणे पार पडल्याचे, आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले.
आरोग्य विभागाच्या परीक्षा सुरळीतपणे पार : डॉ. पाटील
आरोग्य विभागाच्या परीक्षा सुरळीतपणे पार : डॉ. पाटीलSaamTvNews
Published On

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागातील गट ड संवर्गातील एकूण ३४६२ पदे भरण्यासाठीची लेखी आज सुरळीतपणे पार पडल्याचे, आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, आज राज्यातील १३६४ केंद्रांवर परीक्षा पार पडली. या परीक्षेसाठी ४,६१,४९७ उमेदवारांनी अर्ज केले होते. ४१२२०० उमेदवारांनी प्रवेशपत्र प्राप्त करून घेतले होते. चंद्रपूर, भंडारा, अकोला, मुंबई व ठाणे जिल्हयांमध्ये उमेदवारांनी परिक्षेचा पेपर फुटल्याचा संशय व्यक्त करून परिक्षा देण्यास नकार दिला. मात्र त्यांच्या संशयात काहीही तथ्य नाही.

कारण परीक्षेच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना नियुक्ती करण्यात आली होते. त्यामुळे काही उमेदवारांनी व्यक्त केलेल्या शंकेला काहीही आधार नाही. याबाबत कोणा उमेदवारांना आपले म्हणणे मांडावे, त्याबाबतची सत्यता तपासून पाहिली जाईल. वरील केंद्रांवर उमेदवारानां सर्व परिस्थिती समजावून सांगितल्यानंतर त्यापैकी मोहाडी, जि. भंडारा वगळता इतर केंद्रातील सर्व उमेदवारांनी परिक्षा दिली आणि परीक्षा प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली, असे त्यांनी स्पष्ट केले.

आरोग्य विभागाच्या परीक्षा सुरळीतपणे पार : डॉ. पाटील
"नारायण राणेंनी शिवसेनेवर कुत्र्यासारखे भुंकणे बंद करावे" : आ.गायकवाड

बीड येथे तीन उमेदवारांनी आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपरकरणाव्दारे परिक्षा देण्याचा प्रयत्न केला. परंतु स्थानिक पोलीसांनी वेळीच या उमेदवारांना ताब्यात घेतले. याबाबत पुढील कार्यवाही पोलीसांकडून करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com