मुख्याध्यापकांने पुस्तकं रेखाटली शाळेच्या भिंतीवर; शाळेला दिलं किल्ल्याचं रूप

लॉकडाऊनचा सदुपयोग करत सरपंच व गावकऱ्यांच्या मदतीने आता गावखेड्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळेशी स्पर्धा करत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार आहे.
मुख्याध्यापकांने पुस्तकं रेखाटली शाळेच्या भिंतीवर; शाळेला दिलं किल्ल्याचं रूप
मुख्याध्यापकांने पुस्तकं रेखाटली शाळेच्या भिंतीवर; शाळेला दिलं किल्ल्याचं रूपदीपक क्षीरसागर

लातूर - कोरोना काळात शिक्षणापासून दूर गेलेले विद्यार्थी शिक्षणाच्या सानिध्यात यावा सोबतच त्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील खरोसा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या ध्येयवेड्या मुख्याध्यापकांने सरपंच आणि गावकऱ्यांच्या मदतीने शाळेचे रूप बदलेल आहे. लॉकडाऊनचा सदुपयोग करत सरपंच व गावकऱ्यांच्या मदतीने आता गावखेड्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळेशी स्पर्धा करत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार आहे.

ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळेच प्रस्त मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या महामारीच्या कहर झाल्याने शाळा बंद असल्यामुळे गावखेड्यातला विद्यार्थी शाळा आणि अभ्यासापासून दूर गेला असल्याने गुणवत्ता टिकवणं महत्त्वाचे होत.

हे देखील पहा -

यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून बाला उपक्रम राबविण्याचा निर्णय औसा तालुक्यातील खरोसा येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संजय रणदिवे यांनी गावचे सरपंच अजय साळुंके शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शमशोद्दीन शेख सहशिक्षक संजय पाटील आणि लिंबराज होगले यांच्या सहकार्याने शाळाच रुप बदलण्याचा निर्णय घेतला शाळेच्या गेटला रायगड किल्ल्याच रूप देण्यात आलं.

तर मैदानात भूमिती विषयांच्या आकृत्या साकारल्या शाळेच्या अंतर्गत भागात इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विषयाचा अभ्यास रेखाटला शाळेतील झाडावर आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे यासोबतच भूगोल, मराठी, विज्ञान, इंग्रजी, गणित आदी विषयावर चित्रकृतीत रेखाटलं आहे यातून बौद्धिक प्रगती साधली जाणार आहे

मुख्याध्यापकांने पुस्तकं रेखाटली शाळेच्या भिंतीवर; शाळेला दिलं किल्ल्याचं रूप
मोरणा- गुरेघर धरणाचे दोन वक्र दरवाजे अडीच फुटाने उचलले

केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा पर्यावरणाचा अभ्यास, कला कौशल्य आत्मसात करण्यासाठी अमपीथेटर ऑक्सिजन बँक वाचनालय, रोपवाटिका यासोबतच शारीरिक विकास करण्यासाठी विविध प्रकारच्या सोईसुविधा निर्माण केल्या आहेत. यास गटशिक्षणाधिकारी अनुपमा भंडारी, केंद्रप्रमुख कमलाकर सावंत आदी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोठी मदत व सहकार्य केले आहे.

मराठी शाळांवर संक्रात आली आहे. तर दुसरीकडे गावखेड्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता जिल्हा परिषदेच्या गावखेड्यातील शाळांनी कात टाकली आहे. कोरोना काळात शाळा व अभ्यासापासून दूर गेलेल्या विद्यार्थ्यांना आता शाळा नव्या रूपात अनुभवायला मिळणार असून शारीरिक बौद्धिक आणि मानसिक विकास नक्कीच साध्य होणार आहे यात शंका नाही.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com