आंबेओहळ प्रकल्पाच्या पाण्याला राजकीय वळण; श्रेयवादावरुन हसन मुश्रीफांची चंद्रकांत पाटलांवर टीका

राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच भाजपनेही या धरणाच्या कामाचे श्रेय घेणारे प्लेक्स झळकवले
आंबेओहळ प्रकल्पाच्या पाण्याला राजकीय वळण; श्रेयवादावरुन हसन मुश्रीफांची चंद्रकांत पाटलांवर टीका
आंबेओहळ प्रकल्पाच्या पाण्याला राजकीय वळण; श्रेयवादावरुन हसन मुश्रीफांची चंद्रकांत पाटलांवर टीकाSaamTV
Published On

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील आजरा (Ajara) तालुक्यामधील आंबेओहळ प्रकल्पाचं (Ambeohal project) आज लोकार्पण व जलपूजनाचा कार्यक्रम झाला, जलसंपदा मंत्री जयंत पाटील,(Jayant Patil) ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला खरा मात्र आता या धरणावरूनाच्या पाण्यावरुन राजकारण चांगलच तापलं आहे. कारण आहे ते म्हणजे आजच्या या पाणीपूजनाच्या दिवशीच राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच भाजपनेही या धरणाच्या कामाचे श्रेय घेणारे प्लेक्स झळकवले आहेत त्यामुळे हसन मुश्रीफ चांगलेच संतापले. (Hasan Mushrif criticizes Chandrakant Patil over Ambeohal project)

हे देखील पहा-

'आंबेओहळ प्रकल्पाचं काम गेली दहा वर्षे रखडलं होतं मी या खात्याचा मंत्री असताना पाठपुरावा केला, या प्रकल्पासाठी मी पॅकेज मंजूर केलं, आज कोणीतरी याचं श्रेय घेत असल्याचं मी पाहिलं पण हेच लोक घळभरणी थांबवण्यासाठी न्यायालयात गेले होते. चंद्रकांत पाटलांना याची लाज वाटली पाहिजे'. अशा परखड शब्दात हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर टीका केली आहे.

आंबेओहळ प्रकल्पाच्या पाण्याला राजकीय वळण; श्रेयवादावरुन हसन मुश्रीफांची चंद्रकांत पाटलांवर टीका
मुंबई-गोवा महामार्गाबद्दल सुनील तटकरेंनी व्यक्त केलं दुःख!

दहा वर्ष मी आमदार असताना प्रकल्प का रखडला असं ते आजपर्यंत म्हणत होते मग तोच प्रकल्प आता पुर्ण करुन दाखवला आहे त्यामुळे त्यांनी आता या कामाच स्वागत करायला हवं होतं, अशा शब्दात त्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com