कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफ

उपाध्यक्षपदी काँग्रेसचे आमदार राजीवबाबा आवळे यांची निवड झाली आहे.
Hassan Mushrif
Hassan MushrifSaam TV

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड झाली आहे. अध्यक्ष निवडी संदर्भात सर्किट हाऊस इथं सुरू असणारी संचालकांची बैठक संपली आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ अपेक्षेप्रमाणे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) याच्या गळ्यात तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे आमदार राजीवबाबा आवळे यांची निवड झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने (NCP) शिवसेनेची मागणी पुन्हा डावलल्याचं दिसत आहे.

Hassan Mushrif
पराभव जिव्हारी! उमेदवाराच्या पतीकडून विजयी उमेदवाराला अश्लील शिवीगाळ

राजकीय दृष्टया चर्चेत असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची (Kolhapur District Central Coperative Bank Election) निवडणुक अतीशय चर्चेत होती. या बॅंकेच्या २१ पैकी सहा संचालकांची बिनविरोध निवड झाली होती. यात राज्यात सत्ताधारी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीचे वर्चस्व होते.

या बँकेच्या निवडणुकीत (Kolhapur DCC Bank Election) सत्ताधारी गटाबरोबर ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ , गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil), खासदार धैर्यशील माने, राष्ट्रवादीचे (NCP) जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा कस लागला होता. विरोधी शिवसेनेच्या पॅनेलमध्ये खासदार संजय मंडलिक, बाबासाहेब पाटील, उत्तम कांबळे, शेकापचे क्रांतिसिंह पाटील यांचा समावेश होता.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com