बीडमध्ये मनसे आक्रमक; मशिदीवरील भोंगे उतरवा म्हणत लाऊडस्पीकरवर लावली हनुमान चालीसा

"जर मशिदीवरील भोंगे काढले नाहीत तर आम्ही आमच्या समाजाची जनजागृती डीजे लावून करू"
Beed MNS News
Beed MNS Newsविनोद जिरे
Published On

विनोद जिरे

बीड: मशिदींवरील बेकायदेशीर भोंगे उतरवा नाहीतर आम्ही लाऊडस्पीकरवर 'हनुमान चालीसा' लावू, असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर झालेल्या सभेत दिला होता. हा इशारा मनसेकडून प्रत्यक्षात आणायला सुरुवात झाली आहे. बीडमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी, शहरातील विप्र नगर भागातील 32 फूट उंच असणाऱ्या हनुमानाच्या मूर्ती समोर, सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावून, पठण केले आहे. (Beed MNS News)

Beed MNS News
Sanjay Raut: मी सर्वसामान्य शिवसैनिक, किरीट सोमय्या 'चु**'...; राऊत कडाडले

...तर डीजे लावून आम्ही हनुमान चालीसाचे पठण करू;

मनसे शहर उपाध्यक्ष करण लोंढे यांच्यासह कार्यकर्त्यांनी या हनुमान चालीसाचे पठण केले आहे. दरम्यान आमचा कोणत्या जाती धर्माला विरोध नाही, मात्र तात्काळ मशिदीवरील बेकायदेशीर भोंगे उतरवले नाहीत. तर डीजे लावून आम्ही हनुमान चालीसाचे पठण करू. असा इशारा शहर उपाध्यक्ष करण लोंढे यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिलाय.

हे देखील पहा-

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com