Halal Vs Jhatka : हलाल विरुद्ध झटका, वाद पेटला; हिंदू दुकानातून मटण खरेदी करा, राणेंचं आवाहन

Halal Controversy : तुम्ही मटण खात असाल अथवा नसाल. पण तुम्ही हे दोन्ही शब्द मात्र ऐकलेच असतील. आता याच हलाल आणि झटका मटणवरुन वाद पेटलाय. मात्र या दोन्ही पद्धती काय आहेत? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
Halal Vs Jhatka Controversy
Halal Vs Jhatka ControversyX (Twitter)
Published On

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

हलाल आणि झटका प्रकारच्या मटणाच्या वादाने पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. तर हिंदूंनी मल्हार सर्टिफिकेशन असलेल्या दुकानातून मटन खरेदी करण्याचं आवाहन मत्स्य उत्पादन मंत्री नितेश राणेंनी केलं आहे. पुन्हा चर्चेत आलेलं हलाल आणि झटका हे प्राण्यांच्या मांसावरुन नाही तर त्याला कापण्याच्या पद्धतीवरुन ठरवलं जातं... मात्र हे हलाल मटन म्हणजे काय? पाहूयात.

'हलाल' म्हणजे काय?

- इस्लाममध्ये फक्त हलाल मांसाला परवानगी

- हलाल पद्धतीत जनावराच्या मानेची नस कापली जाते

- प्राण्याचं संपूर्ण रक्त बाहेर पडण्याची वाट पाहिली जाते

- प्राणी पूर्ण मेल्यानतंर त्याच्या शरिराचे हिस्से केले जातात

- प्राणी कापण्याआधी पोट भरून जेवण दिलं जातं

Halal Vs Jhatka Controversy
Maharashtra Budget 2025 : लाडकीमुळे तिजोरीवर भार, सर्वाधिक तरतूद, कोणत्या खात्यासाठी किती बजेट? वाचा

दुसरीकडे हिंदू धर्मात हलाल पद्धतीवर आक्षेप घेत झटका पद्धतीचं मांस खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र झटका मटन म्हणजे नेमकं काय? पाहूयात.

'झटका' म्हणजे काय?

- धारदार शस्त्राने प्राण्याची मान एका झटक्यात धडापासून वेगळी करणे

- झटक्यातील प्राण्याला मारण्यापूर्वी बेशुद्ध केलं जातं.

- प्राण्याला कापण्याआधी उपाशी ठेवलं जातं

हलाल आणि झटका या प्राण्यांना कापण्याच्या दोन पद्धती असल्या तरी त्याचा धार्मिक धृवीकरणासाठी वापर सुरु करण्यात आलाय. त्यामुळे या धार्मिक धृवीकरणाच्या आगीचे दोन्ही धर्मातील सर्वसामान्यांना चटके बसण्याची शक्यताच जास्त आहे.

Halal Vs Jhatka Controversy
Beed Crime : धसांच्या नंतर संदीप क्षीरसागर अडचणीत? तहसीलदाराला धमकावलं, 'ती' ऑडिओ क्लिप व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com