Jalna News : जालन्यात जीएसटी आणि आयकर विभागाचं धाडसत्र; पोलाद स्टील कंपन्या रडारवर

GST and Income Tax Department Raids in Jalna : पोलाद स्टीलमध्ये काल दुपारनंतर ही कारवाई करण्यात आली असून या बाबद कंपनी प्रशासनकडून मार्च असल्याने आयकर आणि जीएसटी विभागाकडून वार्षिक तपासणी करण्यात येत असल्याची माहिती दिली आहे.
Jalna News
Jalna NewsSaam TV
Published On

Jalna News :

जालना शहरातील औद्योगिक वसाहतीत पोलाद स्टील कंपन्यांवर आयकर आणि जीएसटी विभागाकडून छापेमारी करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. गुरुवारी दुपारपासून आयकर विभागानच्या नागपूर, कोल्हापूर, पुणे, नाशिक पथकांनी आणि त्याचबरोबर जीएसटी विभागाकडूनही तपासणी करण्यात आल्याची माहिती समोर आलीय.

Jalna News
Jalna News : ठेवीदारांचा रास्ता रोको; ज्ञानराधा पतसंस्थेतील ठेवी परत देण्याची मागणी

यात पोलाद स्टीलमध्ये काल दुपारनंतर ही कारवाई करण्यात आली असून या बाबद कंपनी प्रशासनकडून मार्च असल्याने आयकर आणि जीएसटी विभागाकडून वार्षिक तपासणी करण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. मार्च असल्याने या वार्षिक तपासण्या सुरु असल्याच ही प्रशासनाने सांगितलंय. त्याचबरोबर या पथकाकडून सर्व कंपनी खात्याचे विवरण ही घेण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

सेल्स आणि उत्पादनाचा अभिलेख ही तपासल्या गेला असल्याचं सांगण्यात आलं आहे. या कारवाईमुळे स्टील उद्योगात खळबळ उडालीये. मात्र,मार्च असल्याने वर्षिक विवरण तपासणीसाठी आयकर आणि जीएसटी विभागाकडून वार्षिक रुटीन तपासणी करण्यात येत असल्याची माहिती कंपनी प्रशासनकडून देण्यात आलीय.

तर दुसरीकडे आयकर विभागाच्या पथकाकडून जालन्यातील मोढा परिसरात २ कंपन्यांवर देखील धाडी टाकल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे व्यापारी वर्गात एकच खबळ उडाली आहे. या व्यापऱ्याची आजही चौकशी होण्याची शक्यता खात्रीलायक माहिती आयकर विभागच्या सूत्राकडून देण्यात आली आहे.

आयकर विभागाला (Income Tax Department) मिळालेल्या माहितीच्या आधारे या धाडी टाकण्यात आल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. संपूर्ण तपासणी झाल्यानंतर काय सापडलं याबाबद आयकर विभागाचे अधिकारी सविस्तर माहिती देतील असं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. या धाड सत्रामुळे शहरात आणि मोढा परिसरत असलेल्या व्यापऱ्यात खबळ उडालीय.आजहीही कारवाई सुरुच राहण्याची शक्यता आहे.

Jalna News
Kolhapur Crime News : मोबाईल शॉपी फोडणा-यास 24 तासांत अटक,13 मोबाईल हस्तगत; शाहूपुरी पाेलिसांची कामगिरी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com