नागपूर - सर्वोच्च न्यायालयानं ओबीसींचं राजकीय आरक्षण OBC Reservation रद्द ठरविल्यानंतर राज्यातील पाच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका Election पार पडला. या पोटनिवडणुकीत नागपूर Nagpur जिल्ह्यात काँग्रेसला Congress यश मिळालं. 16 पैकी 9 जागांवर काँग्रेसनं विजय मिळविला. भाजपला केवळ तीन जागांवर विजय मिळविला आला. ही पोटनिवडणुक राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांसाठी लिटमस टेस्ट होती. या टेस्टमध्ये कॉंग्रेस पास झाली आहे.
नागपूर जिल्हा परिषदेच्या एकूण १६ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज घोषित झाला. यामध्ये कॉंग्रेसने ९ जागांवर विजय मिळविला. भारतीय जनता पक्षाने ३, राष्ट्रवादी २, गोंडवाना गणतंत्र पार्टी १ तर शेकापने एका जागेवर आपली मोहोर उमटवली. शिवसेनेला भोपळाही फोडता आला नाही.
हे देखील पहा -
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला मोठा झटका बसला होता. माजी महापौर संदीप जोशी यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि कॉंग्रेसचे अभिजित वंजारी आमदार म्हणून निवडून आले. तेव्हापासूनच महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला होता, तर भाजप थोडीशी का होईना नैराश्यात गेल्यासारखी दिसत होती. आज लागलेल्या निकालानं भाजपमधील नैराश्य अधोरेखित झाले आहे. या निवडणुकीत भाजपकडून माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशिवाय इतर कुणीही सक्रिय दिसले नाही. मात्र, काँग्रेसनं हा विजय पैसा आणि सत्तेच्या भरवश्यावर मिळविला, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
दुसरीकडे कॉंग्रेसचे हेवीवेट नेते मंत्री सुनील केदार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी जोरदार प्रचार केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एकही बडा नेता नागपूर जिल्ह्यात फिरकला नाही. तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक हे केदारांच्या खांद्याला खांदा लावून लढले. ही निवडणूक अंगावर घेतलेल्या सुनील केदार यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना चांगलेच पाठबळ दिलं.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत मिळून लढली तर आजही विरोधकांना धूळ चारू शकते, हे सिद्ध करणारी ही पोटनिवडणूक ठरली, असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही. मात्र, या निवडणुकीतिला यशानं काँग्रेस बळ मिळालं असून याचा फायदा त्यांना पुढच्या निवडणुकांमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागपूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल
०१) केळवद- सुमित्रा कुंभारे- काँग्रेस
०२) वाकोडी- ज्योती सिरसकर- काँग्रेस
०३) राजोला- अरुण हटवार- काँग्रेस
०४) गुमथाळा- दिनेश ढोल- काँग्रेस
०५) वदोडा-अवंतीका लेकुरवाळे- काँग्रेस
०६) आरोली- योगेश देशमुख- काँग्रेस
०७) करंभाड- अर्चना भोयर- काँग्रेस
०८) निलडोह- संजय जगताप- काँग्रेस
०९) गोधणी (रेल्वे)- कुंदा राऊत- काँग्रेस
१०) येनवा- समीर उमप- शेकाप
११) डिगडोह-रश्मी कोटगुले- राष्ट्रवादी
१२) भिष्णुर- प्रवीण जोध राष्ट्रवादी
१३) बोथीय पालोर- हरिष उईके- गोंडवाना
१४) पारडशिंगा- मीनाक्षी सरोदे- भाजप
१५) सावरगाव - पर्वता काळबांडे- भाजप
१६) इससानी- अर्चना गिरी- भाजप
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.