Gram Panchayat Election Results : मंत्री संदिपान भुमरे यांची कन्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलकडून विजयी

राज्यातील ७ हजार १३५ ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार आहे.
Gram Panchayat Election
Gram Panchayat ElectionSaam tv
Published On

मंत्री संदिपान भुमरे यांची कन्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलकडून विजयी

शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री संदीपान भुमरे यांच्या कन्या सौ. प्रेरणा प्रतापसिंह पंडित (भुमरे) या दैठण (ता. गेवराई, जि. बीड) ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वा खालील राष्ट्रवादीच्या पॅनलकडून सरपंचपदासाठी विजयी झाल्या आहेत.

पुणे जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींचे निकाल

पुणे जिल्ह्यात एकूण 221 जागा

राष्ट्रवादी - 105 जागा

काँग्रेस - 44 जागा

भाजप - 33 जागा

ठाकरे गटाला - 15 जागा

शिंदे गटाला - 7 जागा

वंचीत बहुजन आघाडी - 1 जागा

अपक्ष - 13

जिल्ह्यात 3 जागा रिक्त आहेत

नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस ठरला क्रमांक १ चा पक्ष

नाशिक जिल्ह्यातील १९६ ग्रामपंचायतींचे अंतिम निकाल हाती

- जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस ठरला क्रमांक १ चा पक्ष

- राष्ट्रवादीने ६३ ग्रामपंचायतींवर मारली बाजी

- तर ५५ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर भाजप विजयी

- ठाकरे गट २८ जागांसह तिसऱ्या स्थानी

- तर शिंदे गटाला २२ जागा

- जिल्ह्यात १ खासदार, २ आमदार आणि पालकमंत्री शिंदे गटाचे असताना शिंदे गट चौथ्या क्रमांकावर

- तर नव्यानेच राजकारणात आलेल्या स्वराज्य संघटनेलाही २ जागी यश

अहमदनगर जिल्ह्यातील २०३ ग्रामपंचायतींचे निकाल

एकुण ग्रामपंचायत - 203

203 पैकी 128 ग्रामपंचायत निकाल हाती

ठाकरे गट = 15

शिंदे गट -= 00

भाजप- = 48

राष्ट्रवादी- = 33

काँग्रेस- = 22

इतर - 10

तारु पिंपळवाडी ग्रामपंचायतीत लहान मुलाच्या हाताने चिठ्ठी पाडून निकाल

माधव सावरगावे

पैठण तालुक्यातील तारु पिंपळवाडी ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीत समसमान मते पडल्याने लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठी टाकण्यात आली. यात वंदना थोटे या विजयी झाल्या आहेत. छाया थोटे आणि वंदना थोटे यांना 164-164 अशी समसमान मते पडली होती. यात वंदना थोटे या नशीबवान ठरल्या आणि विजयी झाल्या.

धुळे जिल्ह्यातील १२० ग्रामपंचायतींचे निकाल

धुळे जिल्हा 128 ग्रामपंचायत पक्षणिहाय निकाल

भाजप- 68

काँग्रेस- 30

राष्ट्रवादी- 10

शिवसेना शिंदे- 9

शिवसेना ठाकरे- 7

ईतर- 4

अहमदनगर जिल्ह्यातील २०३ ग्रामपंचायतींचे निकाल

अहमदनगर जिल्हा एकूण ग्रामपंचायत - २०३

*निकाल २०३/२०३

भाजप - ७४

राष्ट्रवादी - ६८

काँग्रेस - २७

ठाकरे गट - १९

शिंदे गट - ०१

इतर - १४

जळगाव जिल्ह्यातील १४० ग्रामपंचायतींचे निकाल

जळगाव जिल्हा एकूण ग्रामपंचायत - १४०

निकाल १४०/१४०

ठाकरे गट - १३

शिंदे गट - २७

भाजप- ४३

राष्ट्रवादी- ३२

काँग्रेस- १६

इतर- ०९

भाजप आणि शिंदे गट - ७०

महविकास आघाडी - ६१

नाशिक जिल्ह्यातील १९६ ग्रामपंचायतींचे निकाल

निकाल - १९६/१९६

भाजप - ५५

शिंदे गट - २२

ठाकरे गट - २८

राष्ट्रवादी काँग्रेस - ६३

काँग्रेस - ०८

माकप - ०१

स्वराज्य संघटना - ०२

इतर - १७

नंदूरबार जिल्ह्यातील १२३ ग्रामपंचायतींचे निकाल

एकुण ग्रामपंचायती - 123

जाहीर झालेले निकाल - 123

भाजपा - 32

कॉग्रेस - 33

राष्ट्रवादी - 03

शिंदे गट - 32

उद्धव गट - 13

अपक्ष - 10

बारामतीमधील पणदरे ग्रामपंचायत निवडणुकीत आई आणि मुलगा झाले ग्रामपंचायत सदस्य...

आज बारामतीत 13 ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी पार पडली. यामध्ये बारामती तालुक्यातील पणदरे येथील ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये आई आणि मुलाने ग्रामपंचायत निवडणूक जिंकून आई आणि मुलगा हे दोघे सदस्य ग्रामपंचायत  झाले आहेत. विक्रम कोकरे आणि संगीता कोकरे अशी त्यांची नावे आहेत. बारामती तालुक्यात प्रथमच आई आणि मुलगा हे एकाच ग्रामपंचायतचे सदस्य झाल्याची घटना आहे.

नंदूरबारमधील 123 ग्रामपंचायचा निकाल जाहीर; काँग्रेसला जोरदार फटका, शिंदे गटाची मुसंडी

नंदुरबार जिल्ह्यातल्या 123 ग्रामपंयाचीचे निकाल जाहीर झाले असुन सर्वाधिक 33 जागा मिळवत कॉंग्रेस अग्रस्थानी असली तरी या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला जोरदार फटका बसला आहे. नंदुरबार तालुक्यात कॉंग्रेसला खाते सुद्धा उघडता आले नाही. तर दुसरीकडे शिंदे गटाने 32 ग्रामपंचायतींवर विजय संपादीत करत जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारली आहे.

विशेष म्हणजे जिल्ह्यात भाजपाचे पालकमंत्री खासदार,आमदार असतांना देखील त्यांना हव तसे यश संपादीत करता आले नाही. भाजपा 32 जागांवर विजयी झाली असली तरी नंदुरबार तालुक्यासह, धडगाव आणि अक्कलकुवा आणि नवापुर या ठिकाणी त्यांना फटका बसला आहे. अक्कलकुवा तालुक्यात शिवसेना उद्धव गटाने बाजी मारली असुन जिल्ह्याभरात उद्धव गटाच्या 13 ग्रामपंचायती निवडुन आल्या आहेत. तर 10 ग्रामपंयाचतींनी तटस्थची भुमिका ठेवली आहे. राष्ट्रवादी देखील तीनच ग्रामपंचायतींमध्ये विजयी झाली आहे.

भंडाऱ्यात आम आदमी पार्टीने निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदा उघडले खाते

भंडाऱ्यात आम आदमी पार्टीने निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच खाते खोलले आहे. पाथरी ग्रामपंचायत सरपंच पदाकरिता आम आदमी पार्टीच्या विद्या गुरुदास कोहळे या विजयी झाल्या आहेत.

विखे पाटलांनी आपला गड राखला...

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतवर विखेंची सत्ता.12 ग्रामपंचायतवर भाजपाच्या विखेंचा झेंडा. स्थानिक पातळीवर विखे गटाच्या विरोधात विखे गटाचीच लढाई. विखे पाटील गटाची 12 ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता.

महालगाव ग्रामपंचायत उद्धव ठाकरे गटाच्या ताब्यात

औरंगाबाद : वैजापुर तालुक्यात शिंदे गटाचे आमदार रमेश बोरणारे यांना धक्का; महालगाव ग्रामपंचायत उद्धव ठाकरे गटाच्या ताब्यात. महालगाव ग्रामपंचायतीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी जिल्हा परिषद सभापती अविनाश गलांडे आणि सरपंचपदी रोहिणी काळे विजयी झाल्या आहेत.

गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री सरपंचपदी विजय

आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडीमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची एकतर्फी सत्ता आलीये. सरपंच पदाच्या उमेदवार असलेल्या पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर सरपंच पदावर विजयी झाल्या आहे.

औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरेंना धक्का, बिडकीन ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाची सत्ता

औरंगाबाद - पालकमंत्री संदिपान भुमरे यांना पैठण तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये धक्का. बिडकीन ग्रामपंचायतीमध्ये ठाकरे गटाचे अशोक धर्मे 1200 मताने विजयी.

सातपाटी ग्रामपंचायतीमध्ये 17 पैकी मनसेचे आठ सदस्य विजयी

पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेला सातपाटी ग्रामपंचायतीमध्ये सतरा पैकी मनसेचे आठ सदस्य आत्तापर्यंत विजयी झाले आहेत. तर मनसेचे सरपंच पदाचे उमेदवार अभिजीत तरे 800 मतांनी आघाडीवर आहेत.

मंगळवेढा तालुक्यात भाजपचे आमदार समाधान आवताडे गटाचे वर्चस्व

मंगळवेढा तालुक्यात पुन्हा एकदा भाजपचे आमदार समाधान आवताडे यांच्या गटाने बाजी मारली आहे. आमदार समाधान आवताडे यांच्या गटाने 18 पैकी 9 ग्रामपंचायतीवर एक हाती वर्चस्व मिळवले आहे. तर स्थानिक समविचारी आघाडीला ही 9 पंचायतीवर प्रथमच सत्ता मिळाली आहे.पंचायतीच्या निवडणुकीमध्ये यांच्या विरोधात महाविकास आघाडीसह आले होते. तरी आमदार अवताडे गटाने सत्ता राखण्यात यश मिळवले आहे.आमदार अवताडे गटाने मारापुर, गुंजेगाव, येड्राव, डोंगरगाव, खाजापुर,रहाटेवाडी, भालेवाडी, सोड्डी, खोमनाळ या ९ ग्रामपंचायतीवर सत्ता. मिळवली आहे.

अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायतचा निकाल...

एकूण ग्रामपंचात:-252

बिनवरोध ग्रामपंचायत एकूण - 5

शिवसेना - 1

शिंदे गट - 1

भाजप - 7

राष्ट्रवादी - 6

प्रहार - 6

काँग्रेस - 21

मनसे - 0

युवा स्वाभिमान - 8

वंचीत:-1

इतर - 6

आतापर्यंतच्या निकालात जिल्ह्यात काँग्रेस पक्ष आघाडीवर...

मावळमध्ये राष्ट्रवादीचे 6 उमेदवार विजयी

मावळ तालुक्यात एकूण ९ ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी ६, भाजप एक उमेदवार निवडून आला आहे. २ जागांचे निकाल अद्याप बाकी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी हा गड राखला आहे.

पुणे जिल्ह्यात तीन ठिकाणी काँग्रेसचे सरपंच

पुणे जिल्ह्यातील भोर ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिल्या तीन ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून तिन्ही ठिकाणी काँग्रेसचा सरपंच झाला आहे. कर्नावाड, अंगसुळे, ब्राम्हणघर ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे सरपंच विजयी झाले आहेत. ब्राह्मणघर ग्रामपंचायत रंजना धुमाळ सरपंच विजयी, अंगसुळे ग्रामपंचायत राणी किरवे सरपंच तर कर्नावाड ग्रामपंचायत सोनाली राजीवडे सरपंच झाल्या आहेत.

भोर तालुक्यातील चार ग्रामपंचायतींचे निकाल हाती

भोर तालुक्यातील  ग्रामपंचायत निवडणुकीचा चार ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून दोन ठिकाणी काँग्रेस, एक राष्ट्रवादी, एक स्थानिक आघाडीचा सरपंच विजयी झाले आहेत.

पसुरे गाव : प्रवीण धुमाळ, स्थनिक आघाडी विजयी

वाघस गाव : निकिता आवाळे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार विजयी

कारी: सतीश ढेबे, काँग्रेस उमेदवार विजयी

वाठार: सविता खाटपे, काँग्रेस उमेदवार विजयी

एकूण 5 काँग्रेस, 1 राष्ट्रवादी, 1 स्थानिक आघाडी

बीडमध्ये क्षीरसागर काका पुतण्याच्या लढतीत पुतण्याचा विजय

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदिप क्षीरसागर आणि माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर या काका पुतण्यातील सत्ता संघर्ष ग्रामपंचायत निवडणुकीत देखील पहावयास मिळालाय. नवगन राजुरी जिल्हा परिषद सर्कल मधील नवगण राजुरी या होमपीचवर माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाचा धुव्वा उडवत संदिप क्षीरसागर यांनी काकाला धोबीपछाड दिलाय. या सर्कलमधील चार ग्रामपंचायत संदीप क्षीरसागर यांच्या ताब्यात आल्या आहेत.

भोर मधील तीन ग्रामपंचायतीत काँग्रेसचं वर्चस्व

भोर ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिल्या तीन ग्रामपंचायतींचे निकाल हाती आला आहे. कर्नावाड, अंगसुळे, ब्राम्हणघर ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे सरपंच विजयी झाला आहेत. ब्राह्मणघर ग्रामपंचायत रंजना धुमाळ , अंगसुळे ग्रामपंचायत राणी किरवे तर कर्नावाड ग्रामपंचायत सोनाली राजीवडे विजयी झाले आहेत.

रत्नागिरीत शिंदे गटाला पहिला विजय

रत्नागिरी जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटानं खातं उघडलंय. रत्नागिरी तालुक्यातील केळ्ये ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा विजय झाला असून सौरवी पाचकुडे शिंदे गटाच्या सरपंच विजयी झाल्या. हा उद्योग मंत्री उदय सामंत यांचा मतदार संघ आहे.

एकूण ग्रामपंचायत- 222

बिनविरोध - 66

शिवसेना - 37

शिंदे गट - 09

भाजप- 05

राष्ट्रवादी- 02

काँग्रेस- 00

इतर-13

पंढरपूर तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व; अकरा पैकी चार ग्रामपंचायती भाजपकडे

पंढरपूर तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतींपैकी सात ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीने वर्चस्व मिळवले आहे. तर भाजपला केवळ चार ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवता आली. तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीसाठी चुरशीने मतदान झाले होते. आज सकाळी पंढरपूर येथील तहसील कार्यालयात तहसीलदार सुशील बेलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी पूर्ण झाली.

यामध्ये तुंगत, मेंढापूर या मोठ्या ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता मिळवली आहे. भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांना धक्का बसला आहे. त्यांच्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या लगतच्या पुळूजवाडी ग्रामपंचायतीवर विरोधी परिचारक गटाने सत्ता मिळवली आहे. तालुक्यातील तुंगत ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील व राष्ट्रवादीच्या अभिजीत पाटील गटाने सत्ता मिळवली आहे. भाजपच्या परिचारक गटाच्या ताब्यातून राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता खेचून आणली आहे.

तालुक्यातील एकूण ११ पैकी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या गटाने सर्वाधिक सात ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवली आहे. भाजप पुरस्कृत माजी आमदार प्रशांत परिचारक गटाला केवळ चार ग्रामपंचायतींवर सत्ता मिळाली आहे.

नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल...

नागपूर जिल्ह्यातील 236 ग्रामपंचायतचा सहभाग आहे. प्रत्येक तालुका स्तरावर तहसील कार्यालयात मतमोजणी सुरु झाली आहे. मतमोजणीला दहा वाजता सुरुवात झाली. सहा ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी विजयी. कामठी तालुका खापा आणि गुमथी ग्रामपंचायत मध्ये भाजप विजयी.

कोल्हापूर जिल्ह्यात 19 ग्रामपंचायतींचे निकाल घोषित

कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींपैकी 19 गामपंचायतींचे निकाल हाती आले असून 12 ग्रामपंचायतींमध्ये भाजप शिंदे गटाने झेंडा फडकवला आहे. शिरोळ तालुक्यात शिंदे गटाने सर्वाधिक चार ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. राधानगरी तालुक्यातही शिंदे गटाने खाते उघडलं आहे. हसणे गावच्या पुजा शरद पाटील सरपंचपदी विजयी झाल्या आहेत. आजरा तालुक्यातील सरबळवाडी राष्ट्रवादीने झेंडा फडकवला आहे. सरपंच उमेदवार सुनिता कांबळे विजयी झाल्या आहेत.

बीड जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतीचा निवडणूक रणसंग्राम

बीड जिल्ह्यात 704 ग्रामपंचायत ग्रामपंचायतसाठी निवडणूक सुरू आहे. तर या चार ग्रामपंचायतपैकी 33 ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर एकूण 47 सरपंचपद बिनविरोध आले आहेत. तर उर्वरित 671 ग्रामपंचायतीसाठी 18 तारखेला मतदान झालं. या 671 ग्रामपंचायतीचे भवितव्य आज ठरणार असून जिल्ह्यात अकरा मतमोजणी केंद्रावर प्रत्यक्षात मतमोजणी सुरू झाली आहे.

दरम्यान राज्यात सर्वात जास्त ग्रामपंचायत असल्याने बीडमध्ये दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झालीय. बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर या काका पुतण्यात लढाई आहे. तर परळीत मुंडे बहिण भावाची प्रतिष्ठापणाला लागली असून मुंडेंच्या नाथरा ग्रामपंचायतीत वंचित आघाडीच्या उमेदवारांनी मुंडे बहीण- भावाला आव्हान दिलंय. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार ? याकडे लक्ष लागले आहे

रायगड जिल्ह्यात शिवसेना-शिंदे गटाचा झेंडा

रायगड जिल्ह्यात पाहिले 8 निकाल जाहीर झाले आहेत. महाड तालुक्यात शिवसेना-शिंदे गटाची आघाडी आहे. 8 पैकी 6 ग्राम पंचायतीवर शिवसेना शिंदे गटाचा झेंडा फडकलाय. तर, 2 ग्रामपंचायती महाविकास आघाडीकडं गेल्या आहेत.

पंढरपुरात राष्ट्रवादीची सरशी, आरती अभिजित पवार विजयी

पंढरपूर तालुक्यातील आजोती ग्रामपंचायत सरपंच पदासह सर्व गट राष्ट्रवादीचे निवडून येण्यासाठी अमरजीत पवार हे आग्रही होते. त्यानुसार आरती अभिजित पवार या विजयी झाल्या आहेत.

पृथ्वीराज चव्हाणांच्या गटाला धक्का

सातारा जिल्ह्यात कराड, अंतवडी ग्रामपंचायतीत सत्तांतर झालंय. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला धक्का बसला असून माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचा पॅनेलचा दणदणीत विजय झाला आहे.

आबलोली इथं ठाकरे गटाचा सरपंच विजयी

रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला निकाल जाहीर झाला आहे. आबलोली इथं ठाकरे गटाच्या सरपंच पदाच्या वैष्णवी नेटके विजयी झाल्या आहेत. हा आमदार भास्कर जाधव यांचा मतदार संघ आहे.

Gram Panchayat Election Result 2022 : राज्यातील ७ हजार १३५ ग्रामपंचायत निवडणुकांचा (Gram Panchayat) निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरूवात होईल. सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत मतदार राजा कुणाच्या हाती सत्ता देणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मतमोजणीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडून नये म्हणून पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com