बारावी नंतरच्या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून - सामंत

बारावीनंतर पुढील आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स शाखेतील उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणेच बारावीच्या गुणांनुसार प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारची CET द्यावी लागणार नाही.
बारावी नंतरच्या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून - सामंत
बारावी नंतरच्या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून - सामंत SaamTv
Published On

पुणे : राज्यात बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. बारावी नंतर उच्च शिक्षणासाठी आता या विद्यार्थ्यांच्या कला, विज्ञान व वाणिज्य (Arts,Science & Commerce) शाखांतील प्रवेशाबाबत उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday samant) यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली आहे. यामध्ये बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देखील देण्यात आला आहे.

बारावीनंतर पुढील आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स शाखेतील उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणेच बारावीच्या गुणांनुसार प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारची CET द्यावी लागणार नाही.

ऑनलाईन शिक्षण व परीक्षा न झाल्यामुळे तसेच पूर्व गुणांवर आधारित निकालाच्या निकषामुळे दरवर्षीच्या बारावीच्या निकालाच्या तुलनेत यंदा बारावीचा निकाल तब्बल नऊ टक्क्यांनी जास्त लागला आहे. उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना प्रवेशामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून महाविद्यालयांतील वर्गांच्या तुकड्या वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू शकणार नाही, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

मात्र, विविध व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना CET देणे अनिवार्य राहणार आहे. प्रोफेशनल कोर्ससाठीच्या प्रवेश परीक्षा २६ ऑगस्ट २०२१ पासून सुरु होणार आहेत. मात्र, त्या संबंधीच्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आल्या नाहीत. सध्या या CET परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असून सोमवारपासून अर्ज भरण्यात मुदतवाढ देण्यात आली आहे.

बारावी नंतरच्या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून - सामंत
घरकुलाचा लाभ मिळत नसल्याने पारधी समाजाचा यवतमाळमध्ये मोर्चा

पुढे बोलताना ते म्हणाले, सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला असला तरीही, कोरोनाची स्थिती पाहूनच पुढील शैक्षणिक वर्ष विदयार्थ्यांच्या प्रत्यक्ष पुस्थितीत सुरू करणार आहे. तसेच हे शैक्षणिक वर्ष कधी पासून सुरु करावे याबद्दलचा निर्णय येत्या ८ दिवसात घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळी परिस्थिती आहे. त्यामुळे महाविद्यालये सुरु करताना जिल्हानिहाय निकष वेगवेगळे राहतील.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com