Political News : मनोज जरांगे यांच्या सभेला हिंसक वळण लावण्याचा सरकारचा कट होता : विनायक राऊत

MP Vinayak Raut News : सर्वोच्च न्यायालयानेच थेट हस्तक्षेप करावा असं मला वाटतं.
manoj jarange
manoj jarangeSaam TV
Published On

Ratnagiri News :

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या सभेला हिंसक वळण लावण्याचा सरकारचा डाव होता. मात्र मराठा समाज शांत राहिल्याने सरकारचा डाव फसला, असा खळबळजनक शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांचे आरोप खरे आहेत. जरांगे यांच्या सभेला हिंसक वळण लावण्याचा राज्यकर्त्यांचा कट सुरू होतं. आंदोलनाला हिंसक वळण लागावं, असा डाव शासनातील काही जणांचा होता, पण तो फसला, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

सर्वोच्च न्यायालयानेच थेट हस्तक्षेप करावा

आमदार अपात्रतेप्रकरणाच्या सुनावणीबाबत बोलताना विनायक राऊत यांनी म्हटलं की, सर्वोच्च न्यायालयानेच थेट हस्तक्षेप करावा असं मला वाटतं. कायद्याचं रक्षण करायचं असेल तर सर्वोच्च न्यायालयाला आदेश देण्याशिवाय पर्याय नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कायदा मोडला नाही, पण वेळकाढूपणा ते करत आहेत. त्याचा फायदा थेट शिंदे गटाला होत आहे.

manoj jarange
Chhagan Bhujbal: मराठा समाजाची माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाई करू, मंत्री छगन भुजबळ यांना कायदेशीर नोटीस

मीरा बोरवणकर यांनी पुस्तकात सत्य लिहिलं

पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी आपल्या पुस्तकात अजित पवार यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. त्यावर विनायक राऊत म्हणाले की, मीरा बोरवणकर यांनी पुस्तकात जे लिहिलं आहे, ते 1001 टक्के सत्य आहे. (Political News)

manoj jarange
Raju Shetti News: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रोश पदयात्रेला सुरूवात; साखर कारखान्यांच्या मुद्द्यावरून राजू शेट्टी आक्रमक

ठेकेदारांच्या मुजोरीमुळे काम रखडलं

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत राऊत यांनी म्हटलं की, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे महामार्गाबाबत अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण मुजोरीपणा ठेकेदार करत आहेत, म्हणून हायवे पूर्ण होत नाही. त्याचा परिपाक म्हणून कालची पूल दुर्घटना घडली आहे. पुलाचं थर्ड पार्टी ऑडिट करण्याची आवश्यकता आहे. तशी माझी मंत्री रवींद्र चव्हाण यांना विनंती आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com