पवारांचे ओबीसी प्रेम अचानक का उफाळले- गोपीचंद पडळकरांचा सवाल

शरद पवार कुठलही काम हेतुशिवाय करत नाहीत आणि खरा हेतु कधीच दाखवतही नाहीत असं म्हणत भाजपा आमदार गोपिचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरती थेट टीका केली आहे.
पवारांचे ओबीसी प्रेम अचानक का उफाळले- गोपीचंद पडळकरांचा सवाल
पवारांचे ओबीसी प्रेम अचानक का उफाळले- गोपीचंद पडळकरांचा सवालSaamTv

सांगली : शरद पवार कुठलही काम हेतुशिवाय करत नाहीत आणि खरा हेतु कधीच दाखवतही नाहीत असं म्हणत भाजपा आमदार गोपिचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचेNCP सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरती थेट टीका केली आहे.Gopichand Padalkar questions why Pawar suddenly love with OBC

'केंद्रानं ताट वाढलं आहे, तुमचे हात पण बांधले गेले आहेत तेही खरे आहे पण हे हात कुणामुळं बांधले गेले? केंद्रामुळे की आपल्या पावण्यांच्या प्रेमामुळं? उभ्या आयुष्यात तुम्ही फक्त पुतण्या, मुलगी नातू यांनाचं मोठं केले आणि जेंव्हा जेंव्हा आपण सत्तेचा भाग बनलात तेंव्हा  आपल्या करामतीने मराठा समाजाचेMaratha community हक्काचे आरक्षणReservation घालवले' अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी सांगलीमधीलSangali झरे येथे बोलत असताना पवारांवर केली आहे.

हे देखील पहा-

'हा' घोळ तुमच्याच काळातला

शरद पवारांनी २०११ सालचा सेन्सेस अहवाल केंद्र सरकारने द्यावा आणि जातनिहाय जनगणनेचा डेटाDATA मागितल्या प्रकरणावरुन पडळकरांनीPadalkar पवारांवरती टिका केली तेसच तुम्ही जो डेटा आत्ता मागताय त्याचा घोळ खुद्द शरद पवारSharad Pawar ज्या सरकारमध्ये सहभागी होते मनमोहनसिंग Manmohan Singhयांच्या सरकारनेच हा घोळ घातला आहे असं वक्तव्य देखील पडळकर यांनी केले.

"भागीदारी तुमची, पाप तुमचं आणि बोंबा मात्र मोदी सरकारच्या नावानं ठोकायच्या. जातीयवादीRacist विष पसरवणाऱ्यांना हेच विचारयं तुम्हाला जात निहाय जनगणनेचा डेटा कशाला हवाय" असा सवाल ही पडळकरांनी केला.

पवारांचे ओबीसी प्रेम अचानक का उफाळले- गोपीचंद पडळकरांचा सवाल
17 ऑगस्टला रायगडात भाजपची जन आशीर्वाद यात्रा; कपिल पाटील करणार नेतृत्व

ओबीसींच्याOBC राजकीय आरक्षणाकरिता तुम्हाला इंपेरिकल डेटाImperial data द्यायचाय आणि मराठा आरक्षणाबाबातMaratha Reservation आपण अजून त्यांना मागासलेले सिद्ध करण्याची कोणतीही  प्रक्रीयाच सुरू केलेली नाही. नुसत्या भुलथापा मारायच्या आणि लोकांचं लक्ष विचलीत करायचं,  ही तुमची प्रस्थापितांची करामत आज आम्हा बहुजनांना कळाल्यामुळेच जे मराठा आरक्षणाबाबत बोलताना नेहमी पळ काढत होते.. अशा शरदचंद्र पवारांनांचं आज भूमिका मांडायला लागतेय हाच आमच्या बहुजनांचा प्रस्थापितांविरोधतला पहिला विजय असल्याचा विश्वासही पडळकरांनी यावेळी व्यक्त केला.

"राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून जातीयवाद वाढला"

मनसे अध्यक्ष राज ठाकरेRaj Thackeray यांनी देखील आत्ता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर निशाना साधला होता की राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच राज्यात जातीयवाद वाढला असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते यावरती बोलताना पवार यांनी राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरेंचेPrabodhankar Thackeray साहित्य वाचावे असा सल्ला दिला आहे.

Edited By-Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com