17 ऑगस्टला रायगडात भाजपची जन आशीर्वाद यात्रा; कपिल पाटील करणार नेतृत्व

रायगडात 17 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील हे जन आशीर्वाद यात्रेचे नेतृत्व करणार आहेत. अलिबाग येथून सकाळी साडेआठ वाजता या यात्रेला सुरुवात होणार आहे.
17 ऑगस्टला रायगडात भाजपची जन आशीर्वाद यात्रा; कपिल पाटील करणार नेतृत्व
17 ऑगस्टला रायगडात भाजपची जन आशीर्वाद यात्रा; कपिल पाटील करणार नेतृत्वSaam Tv News
Published On

राजेश भोस्तेकर, रायगड

रायगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राज्यात भाजपची जन आशीर्वाद यात्रा सुरू झाली आहे. रायगडात 17 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील हे जन आशीर्वाद यात्रेचे नेतृत्व करणार आहेत. अलिबाग येथून सकाळी साडेआठ वाजता या यात्रेला सुरुवात होणार आहे. भाजपच्या विविध योजनांची माहिती जनतेला देण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेऊन आशीर्वाद घेण्यासाठी या जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. (BJP's Jan Ashirwad Yatra in Raigad on August 17; Kapil Patil will lead)

हे देखील पहा -

सकाळी साडे आठ वाजता अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोव्हिड सेंटरला प्रथम केंद्रीय मंत्री कपिल पाटील भेट देणार आहेत. त्यानंतर ते 9 वाजता पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर मच्छीमार, प्रकल्पग्रस्त यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. कोव्हिड योध्याचा सत्कारही करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत. हुतात्मा चौकातही हुतात्म्यांना आदरांजली वाहणार आहेत. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभार्थ्याशी संवाद साधणार आहेत. ऐतिहासिक अशा चरी सत्याग्रह ठिकाणी कपिल पाटील भेट देणार आहेत. अलिबाग मधील भाग्यलक्ष्मी हॉल येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर आमदार रवींद्र पाटील यांच्या घरी भेट देऊन ते पनवेलकडे रवाना होणार आहेत.

17 ऑगस्टला रायगडात भाजपची जन आशीर्वाद यात्रा; कपिल पाटील करणार नेतृत्व
रोहित पवार फडकवणार भगवा, तोही सर्वात उंच!

केंद्रीय मंत्री झाल्यानंतर कपिल पाटील यांचा पहिलाच दौरा जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने रायगडात होत आहे. त्या अनुषंगाने अलिबाग शहर हे पूर्ण भाजपमय झाले आहे. शहरात जिल्हा भाजपतर्फे ठिकठिकाणी पक्षाचे बॅनर लावण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यासह विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार रवींद्र पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार गणेश नाईक, आमदार निरंजन डावखरे, आमदार महेश बालदी, आमदार संजय केळकर, आमदार आशिष शेलार, आमदार रमेश पाटील, आमदार नितेश राणे यासह भाजपचे अन्य आमदार, पदाधिकारी, कार्यकार्ते मोठ्या संख्येने या जन आशीर्वाद यात्रेत सामील होणार आहेत. रायगड भाजपतर्फे यात्रेच्या अनुषंगाने पूर्ण तयारी केली असल्याचे दक्षिण जिल्हाध्यक्ष ऍड महेश मोहिते यांनी माहिती दिली.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com