क्रूरतेचा कळस! पोटात चाकू भोसकून गर्भवती श्वानाची हत्या, आंदोलनाचा इशारा

वर्धा येथे माणुसकिला काळीमा फासणारी घटना घडली आहे.
Street Dog
Street DogSaam Tv
Published On

चेतन व्यास

वर्धा : येथे माणुसकिला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका माथेफिरूने गर्भवती श्वानाची पोटात चाकू भोसकून हत्या (Dog death) केल्याने खळबळ उडाली आहे. पाळीव प्राण्यांवर काही माथेफिरू हल्ला करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. वर्ध्यात ही धक्कादायक घटना घडल्याने सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. श्वानाची हत्येची धक्कादायक घटना नुकतीच घडली असून आरोपीवर तातडीने गुन्हा दाखल (Police Case) करून अटक करण्याची मागणी वर्ध्यातील युवा परिवर्तनआवाज संघटनेने केली आहे. देवळी शहराच्या ठाकरे चौकात या माथेफिरूने श्वानाची हत्या केलीय. हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक न केल्यास तीव्र आंदोलन (strike warning) करण्याचा इशाराही या संघटनेने दिला आहे.

Street Dog
खराब फॉर्मशी झुंजणारा विराट कोहली अखेर बोललाच!; म्हणाला, तर आंतरराष्ट्रीय करिअर...

मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात माथेफिरूने रस्त्याच्या बाजूला झोपलेल्या गर्भवती श्वानाच्या पोटात चाकूने सपासप वार केले. माथेफिरूच्या हल्ल्यामध्ये श्वानाचा मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी त्या माथेफिरूला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो गोल्हर गल्लीकडे पळून गेला. या घटनेला दोन दिवसांचा कालावधी उलटला असून अद्याप जिल्ह्यात सक्रीय असलेल्या प्राणी मित्र संघटना तसेच आदी विविध संघटनांनी याची दखल घेतली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाहीय.

अज्ञात माथेफिरुने श्वानाच्या पोटावर चाकूने वार केल्यानंतर श्वानाने जीव वाचविण्याच्या प्रयत्नात पळ काढला. मात्र, काही अंतर दूरवर जातात श्वान जमिनीवर कोसळले आणि जागीच श्वानाचा मृत्यू झाला.या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली.ज्या ठाकरे चौकात ही क्रूर घटना घडली. तेथून पोलीस ठाणे अवघ्या ५० मीटर अंतरावर आहे. हातात खुलेआम चाकू घेऊन एक माथेफिरु परिसरात धिंगाणा घालतो ही मोठी शोकांतिका आहे, अशी प्रतिक्रिया वा परिवर्तन की आवाज संघटनेचे संस्थापक निहाल पांडे यांनी दिलीय.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com