Good News : आता ऊसाचे हमखास १०० टनांचे उत्पादन

फुले १००१ उस वाण
फुले १००१ उस वाण
Published On

अहमदनगर ः राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी हरभरा वाण विकसित केले. उसाच्या विविध जाती शेतकऱ्यांना समृद्धी देणाऱ्या ठरल्या. आता पाडेगाव केंद्राने त्याही पुढे जाऊन भरगोस साखर उतारा देणारे वाण शोधून काढले आहे. विशेष म्हणजे त्या वाणाला मान्यताही मिळाली आहे. Good News: Now we will get 100 tons of sugarcane production

एम.एस. १३०८१ (फुले १०००१) हा ऊसाचा लवकर पक्व होणारा वाण कोएम. ०२६५ व एम.एस. ०६०२ या दोन वाणांच्या संकरातुन नवीन वाण तयार केला आहे. केंद्रीय बियाणे समितीने महाराष्ट्रात या वाणाची लागवडीस मान्यता दिलीय. पाडेगाव येथे विकसित करुन प्रसारित केलेला हा पहिलाच ऊस वाण आहे.

फुले १००१ उस वाण
भाजपच्या वाघांचे शिवसेनेच्या वाघांना चॅलेंज, ही अटक करून दाखवा

या वाणाच्या अखिल भारतीय पातळीवरील दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडु, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या 9 राज्यातील 14 वेगवेगळ्या संशोधन केंद्रावर दोन वर्षात एकूण 34 चाचण्या घेण्यात आल्या. कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील आणि संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांनी ऊस विशेषज्ञ डॉ. भरत रासकर आणि पाडेगाव येथील सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.

पूर्वहंगामात एम.एस. १३०८१ (फुले १००१) या वाणाचे सरासरी ऊस आणि साखर उत्पादन अनुक्रमे १५१.०९ मे.टन/हे. आणि २१.५३ मे.टन/हेक्टर मिळालेले आहे. तथापि काही शेतकऱ्यांनी या जातीचे एकरी १०० मे.टन पेक्षा अधिक उत्पादन घेतले आहे.

ही जात मध्यम ते भारी जमिनीत तसेच क्षारपड जमिनीतही चांगली वाढते. फुटव्याचे प्रमाण चांगले असल्याने खोडव्याचे उत्पादन अधिक मिळते. पाने गर्द हिरवी, रुंद, सरळ वाढणारी व पानाच्या देठावर कुस आढळून येत नाही. खोडकिड, कांडीकिड, शेंडेकिड व लोकरी मावा या किडींना चांगली प्रतिकारक्षम आहे.

ही जात मर व लालकुज रोगास मध्यम प्रतिकारक आहे. ही जात पाण्याचा ताण सहन करते. साखर कारखान्यांच्या सुरवातीच्या गळीत हंगामात अधिक साखर उतारा यासाठी हा वाण पसंतीस पडला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com