कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अत्यंत भयानक परिस्थिती अनुभवणाऱ्या नागपूरकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे. नागपूर जिल्ह्याची सध्या कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून कोरोना रुग्णसंख्या(corona patients) दहा च्या आत आहे. तर मृत्युसंख्या शून्यावर आली आहे. त्यामुळे नागपूरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. Good news for Nagpurkars people is that the number of corona patients in the district is within 10 and the death toll is zero.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागपूर जिल्ह्याची परिस्थिती अत्यंत वाईट होती. दररोज 7 हजारांवर रुग्ण पॉझिटिव्ह(positive) येत होते. तर दिडशेवर मृत्यु दररोज व्हायचे. अशातच तिथे बेड्सची कमतरता असल्याने बेड्स उपलब्ध होत नव्हते त्यामुळे अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले. त्यातच ऑक्सिजनचाही प्रचंड तुटवडा होता. ऑक्सिजन अभावीही अनेक कोरोना रुग्णांचा जीव गेला. सरासरी प्रत्येक घरात एकतरी कोरोना रुग्ण होताच.
नागपूरकरांना दिलासा -
मात्र आता नागपूर मधील कोरोना परिस्थिती सामान्य झाली आहे आणि आता तर जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू झाल्याची चिन्ह दिसत आहेत. जिल्ह्यात दररोज रुग्णांची संख्या 10 च्या खाली आहे तर मृत्यु संख्या शून्यावर आली आहे. प्रशासन, डॉक्टर्स आणि नागरिकांच्या सहकार्याने हे शक्य झालं.(Consolation to the people of Nagpur)
कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. तिसऱ्या लाटेचा धोका अजून कायम आहे. अशावेळी नागरिकांनी अधिक जबाबदारीनं वागण्याची गरज आहे, कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचीही गरज आहे.
नागपूरकरात पावसाचीही हजेरी...
नागपूरात आज अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य सुखावल्याच चित्र नागपूरात दिसत आहे. या पावसामुळं खरीप पिकांना जीवनदान मिळालं असून धानाच्या रोवण्यांना वेग आलाय. इकडे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. धरणातील पाणी साठ्यातही या पावसामुळं वाढ होणार असून. हवामान खात्यानं पुढील दोन दिवस विदर्भात ऑरेंज अलर्ट दिला आहे त्यामुळे नागपूरकरांना मुसळधार (Heavy rain) पावसाला सामोरं जाव लागेल असं वाटत आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.