Gondia: नक्षल्यांनी जमिनीत पेरलेली स्फोटकं पोलिसांनी केली जप्त, घातापात टळला...

गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलीस स्टेशन अंतर्गत गड माता मंदिर परिसरात नक्षल्यांनी पेरून ठेवलेल्या स्फोटकांसह इतर साहित्या गोंदिया पोलिसांनी जप्त केले आहे.
Gondia: नक्षल्यांनी जमिनीत पेरलेली स्फोटकं पोलिसांनी केली जप्त, घातापात टळला...
Gondia: नक्षल्यांनी जमिनीत पेरलेली स्फोटकं पोलिसांनी केली जप्त, घातापात टळला...अभिजीत घोरमारे
Published On

गोंदिया: नक्षल्यांनी पेरून ठेवलेल्या स्फोटकांसह इतर अनेक प्रकारचे साहित्य गोंदिया पोलिसांनी जप्त केले आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा पोलीस स्टेशन अंतर्गत गड माता मंदिर परिसरातील बेवारटोला डैम जवळून हा साठा जप्त करण्यात आला आहे. वेळीच स्फोटके जप्त केल्याने दिवाळीच्या पर्वात मोठा घातापात टळला आहे. (Gondia: Police seize explosives planted by Naxals in the ground, avoid ambush ...)

हे देखील पहा -

नक्षल सेल गोंदियाला खात्रीशीर गुप्त माहिती मिळाल्यावरून नक्षल सेल गोंदिया, सी-60 पथक गोंदिया, सालेकसा तसेच बॉम्ब नाशक पथक आणि श्वान पथकाच्या मदतीने सालेकसा पोलीस स्टेशन अंतर्गत गड माता मंदिर परिसरात शोध घेतला असता तेथे पोलिसांना जिवानिशी ठार मारणे करता गाडून ठेवण्यात आलेले स्फोटक साहित्य, नक्षल साहित्य व काही हत्यारं पोलिसांनी जप्त केले. यात 80 फूट वायर, 8 जिलेटीन काड्या, नॉन इलेक्ट्रिक डिटोनेटर, 2चाकू, 2 गावठी बंदूक, round-2, मेडिसिन बॉक्स, जुने पिस्टल सारखे दिसणारे 2 शस्त्र, नक्सल गणवेश, इलेक्ट्रिक डिटोनेटर 11, प्रिंटेड सर्किट बोर्ड 2, हिरव्या रंगाचे ओलसर स्फोटक पावडर 700 ग्रॅम, जुने देशी कट्टे 2, राखाडी रंगाचे स्फोटक सदृश्य पावडर 700 ग्रॅम असे साहित्य मिळून आल्याने हे साहित्य जप्त केले आहे.

Gondia: नक्षल्यांनी जमिनीत पेरलेली स्फोटकं पोलिसांनी केली जप्त, घातापात टळला...
CRPF जवानांचा सहकारी जवानांवर गोळीबार, तिघांचा मृत्यू

सालेकसा पोलीस स्टेशन येथे नक्षल्यांविरोधात भादवि कलम 307, 120 सह कलम 13, 18, 20, 23 सह कलम भारतीय स्फोटक पदार्थ कायदा 4-5 कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वेळीच गोंदिया पोलिसांनी दखल घेतल्याने दिवाळीच्या पर्वावर घातापात टळला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com