Heavy Rain: अतिवृष्टिने गोंदियात पूरसदृश्य परिस्थिती; पिके पाण्याखाली

अतिवृष्टिने गोंदियात पूरसदृश्य परिस्थिती; पिके पाण्याखाली
Heavy Rain
Heavy RainSaam tv
Published On

गोंदिया : गोंदिया जिल्‍ह्यात सलग सुरू असलेल्‍या अतिवृष्‍टी झाली. या अतिवृष्‍टीमुळे (Heavy Rain) जिल्‍ह्यातील बहुतांश भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे हजारो हेक्टर शेतातील पिके पाण्याखाली गेले आहेत. (Gondia Heavy Rain)

Heavy Rain
वर्धेतून कोणाला मिळणार मंत्रिपदाची संधी; जिल्ह्यातील आमदारांकडून मंत्रिपदासाठी लॉबीग सुरु

गोंदिया (Gondia) जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसाने (Rain) जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना (Farmer) बसला आहे. मुसळधार पावसाने शेतात तळ्याचे स्वरूप आल्याने पिक सडण्याचे चित्र निर्माण झाले आहे. अगोदरच संकटात असलेला शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

ओला दुष्‍काळ जाहीर करा

आधीच्या आलेल्या पुराने नुकसानीचे पंचनामें पूर्ण करायला आठवडा गेल्याने नुकसान भरपाई अद्याप मिळणे बाकी आहे. यात पुन्हा अतिवृष्टि झाल्याने पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले गेले आहे. त्यामुळे सरसकट ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com