सरासरी बिलाच्‍या नावाने अवाजवी बिल; शेतकऱ्याला ५५ हजाराचे बिल

सरासरी बिलाच्‍या नावाने अवाजवी बिल; शेतकऱ्याला ५५ हजाराचे बिल
Mahavitaran Bill
Mahavitaran BillSaam tv

गोंदीया : महावितरणचा अजब कारभार पुन्‍हा चव्हाट्यावर आला आहे. गरीब शेतकऱ्याला सरासरी बिलाच्या नावावर 54 हजार 920 रूपयाचे बिल आले आहे. दर महिन्याचे बिल भरून सुद्धा शेतकर्याला (Farmer) अधिकचा भुर्दंड बसविला गेला आहे. (Gondia News MSEDCL Farmer Bill)

Mahavitaran Bill
Beed: ..तर ग्रामस्थ टाकणार येणाऱ्या निवडणुकांच्या मतदानावर बहिष्कार

गोंदियातून (Gondia) एका गरीब शेतकऱ्याने नियमित वीज बिलाचा भरणा करून सुद्धा महावितरणकडून (MSEDCL) सरासरी बिल आकारले आहे. या सरासरी बिलाच्‍या नावावर चक्क 54 हजार 920 रूपयाचे बिल आल्याचा धक्कादायक प्रकार गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे उघड झाला. भजियापार येथील हनवत नथ्‍थू ठाकरे असे महावितरणच्या पिडीत शेतकऱ्याचे नाव आहे.

वीज पुरवठा खंडीत करण्याचा दम

सरासरीच्‍या नावाखाली अवाजवी बिल आकारल्‍यानंतर देखील महावितरणकडून वीज पुरवठा खंडीत करण्याचा दम त्या शेतकऱ्याला देण्यात आल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. परीणामी महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे ठाकरे कुटुंबियांवर आत्महत्या करण्याची पाळी आली आहे. तेव्हा महावितरणच्या भुमिकेकडे त्या शेतकऱ्याचे लक्ष लागले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com