शुभम देशमुख
गोंदिया : आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर धान विक्री केलेल्या ४३३ शेतकऱ्यांचे ५ कोटी ७२ लाख रुपयांचे चुकारे न मिळाल्याने शेतकऱ्यांनी (Farmer) गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या (Gondia) कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. गेल्या २४ तासापासून हे ठिय्या आंदोलन सुरू आहे. विशेष म्हणजे एका युवा शेतकऱ्याचे तलाठी भरतीचा पेपर होता. मात्र तो या ठिकाणी आंदोलन सहभागी झाल्याने त्याला पेपर देता आले नाही.
गोंदिया तालुक्यातील चुटिया येथील श्रीराम अभिनव या आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी आपले रब्बी हंगामातील धान विक्री केले होते. श्रीराम अभिनव या संस्थेने २८ हजार क्विंटल धानाची अफरातफर केली. जवळपास ५ कोटी ७२ लाख रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी गोंदिया शहर पोलिसात संस्थेचे ११ संचालक आणि ४ कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. मात्र संस्थेचे संचालक आणि कर्मचारी हे फरार आहेत. त्यामुळे पणन कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांना चुकारे द्यायला उशीर होत आहे.
आंदोलन कायम
आता ३ महिन्यापासून सतत आश्वासन मिळत असल्याने अखेर शेतकरी संतप्त झाले आहेत. २४ तासापासून आमदार कार्यालयासमोर ठिय्या मांडला असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.