कोरोना लस घ्या बिनधास्त! गोंदियात सर्वाधिक लसीकरण

गोंदिया ः कोरोना लसीकरणात महिलांची आकडेवारी लक्षणीय आहे.
गोंदिया ः कोरोना लसीकरणात महिलांची आकडेवारी लक्षणीय आहे.
Published On

गोंदिया - पहिल्या लाटेनंतर बाजारात आलेली कोरोना लस किती प्रभावी आहे. कोविशिल्ड घ्यावी की कोव्हॅक्सीन या संभ्रमात अनेकजण होते. लस घेतल्यास अनेक दुष्परिणाम होतील, असाही बाऊ करण्यात आला. सर्वसामान्य नागरिकांसोबतच शासकीय कर्मचारीही लसीकरण करून घेण्यास धजावत नव्हते. परिणामी लोकांवरही त्याचा दुष्प्रभाव पडला. एकूण लसीकरण करवून घेणाऱ्यांची आकडेवारी कमी राहिली. परंतु गोंदिया जिल्हा लसीकरणात आघाडीवर आहे. त्यातही तेथील महिलांचा आकडा पुरूषांपेक्षा जास्त आहे. आर्थिकदृष्ट्या मागास समजल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात लसीकरणाची आकडेवारी प्रगत जिल्ह्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे.

कोरोना लसीकरणात गोंदिया जिल्हा सुरुवातीपासूनच अग्रस्थानी आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 5 लाख 32 हजार, 413 लसीकरण झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यातील महिलाशक्तीने ‘हम किसीसे कम नही’ हे दाखवून देत पुरुषांपेक्षा जास्त संख्येत लसीकरण करवून घेत आघाडी घेतली आहे. आकडेवारीनुसार जिल्ह्यातील 2 लाख 71 हजार, 806 महिलांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. राज्यात सर्वाधिक महिलांचे लसीकरण केलेला गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.Gondia district is leading in corona vaccination in the state

गोंदिया ः कोरोना लसीकरणात महिलांची आकडेवारी लक्षणीय आहे.
राज कुंद्रा आणि कंपनीचे हे होते उद्योग; पोलिसांनी दिली माहिती

गोंदिया जिल्ह्यात 5 लाख 32 हजार 413 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या लसीकरणात महिला शक्तीने आघाडी घेतली आहे. कुटुंबाच्या रक्षणासाठी पुरुषांनीही पुढे यावे, असा संदेश दिला आहे. झालेल्या लसीकरणातून ही आकडेवारी पुढे आली आहे. यामध्ये 2 लाख 60हजार 660 पुरुषांनी लस घेतली आहे. 2 लाख 71 हजार 806 महिलांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. एवढेच नव्हे तर अवघ्या राज्यातच महिलांनी आघाडी घेतलेला गोंदिया जिल्हा एकमेव ठरला आहे.Gondia district is leading in corona vaccination in the state

गोंदिया जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण लक्षणीय आहे. विशेषतः महिलांची आकडेवारी पुरूषांपेक्षा जास्त आहे.

- डॉ. नितीन कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी गोंदिया.

Edited By - Ashok Nimbalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com