गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यांचे अतिरिक्त कार्यभार असलेले स्वीय सहाय्यक आणि दंड शाखेचे अव्वल कारकून राजेश मेमन यांना 10 हजार रुपयाची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयातील लाचलुचपत विभागाची आजपर्यंतची ही पहिलीच घटना आहे. तक्रारदाराचे हार्डवेअर व भांडे विक्रीचे दुकान असून वडिलांच्या निधनानंतर वडिलांच्या नावे असलेल्या किरकोळ फटाका विक्री दुकान परवान्याचे नुतनीकरण व हस्तातंरण करण्याकरीता आवश्यक कागदपत्रासह अर्ज केला होता. परंतु राजेश मेमन यांनी या करीता 10 हजाराची मागणी केली होती. काही दिवसांनी परत तक्रारदार हे बँकेत 900 रुपये भरल्याची चलन पावती जमा केली होती.
मात्र फिर्यादी हे परवाना हस्तांतरणा करीता विचारपूस करायला आले असता मेमन यांनी तक्रारदारास 11 हजार रुपयाची मागणी केली. मात्र तक्रारदारास लाच द्यायची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी गोंदिया लाचलुचपत विभागात तक्रार नोंदवली. त्या तक्रारीची तत्काळ दखल घेत लाचलुचपत विभागाने सापळा रचत पंचसमक्ष 10 हजाराची तडजोडी अंती मागणी करुन ती रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणात गोंदिया लाचलुचपत विभागाच्या वतीने गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन आरोपी राजेश मेमन यास ताब्यात घेतले आहे.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.