Nashik: गोदावरीचं पाणी अंघोळीसाठीही अयोग्य; राष्ट्रीय हरित लवादाची टिप्पणी

Godavari River Nashik: प्रक्रिया न करताच सांडपाणी गोदावरीत सोडलं जात असल्यानं गोदावरीच्या प्रदूषणात भर पडली आहे.
Nashik: Godavari water is polluted not suitable for bathing; Comment of the National Green Arbitration
Nashik: Godavari water is polluted not suitable for bathing; Comment of the National Green Arbitrationअभिजीत सोनानणे
Published On

नाशिक: नाशकातील गोदावरी नदीचं पाणी अंघोळीसाठीही अयोग्य असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय हरित लवादाने (National Green Tribunal) गोदावरी प्रशासनाला नदीच्या पाणी प्रदूषणावरून (Water Pollution) फटकारलं आहे. त्र्यंबकेश्वर, नाशिकमध्ये (Nashik) गोदावरीला जाऊन मिळणारं सांडपाणी रोखण्यात प्रशासनाला अपयश आलं आहे. प्रक्रिया न करताच सांडपाणी गोदावरीत सोडलं जात असल्यानं गोदावरीच्या प्रदूषणात भर पडली आहे. (Godavari water suitable for bathing; Comment of the National Green Arbitration)

हे देखील पहा -

4 ते 5 दशलक्ष पाण्यांपैकी केवळ 1 हजार दशलक्ष सांडपाण्यावर प्रक्रिया होत आहे. अंघोळीसाठीही योग्य नसलेलं पाणी मनुष्य आणि प्राणी पित असल्यानं त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय. त्यामुळे गोदावरीच्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

गोदावरी नदी बद्दल:

गोदावरी नदीची गणना भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते. या नदीला दक्षिण गंगा असे ही म्हटले जाते. गोदावरी नदीची लांबी १,४५० किलोमीटर (९०० मैल) आहे. गोदावरीचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात होतो. साधारणत: आग्नेय दिशेला वाहून गोदावरी राजमहेंद्रीजवळ बंगालच्या उपसागरास आंध्रप्रदेशात मिळते. दारणा, प्रवरा, वैनगंगा, मांजरा इ. उपनद्या असलेल्या गोदावरीचे राजमहेंद्रीपासून १० किमी अंतरावर व समुद्रापासून ८० किमी आधी समुद्रास मिळण्यापूर्वी दोन उपवाहिन्यांमध्ये विभाजन होते. त्यांना गौतमी नदी आणि वसिष्ठा नदी असे म्हणतात. गोदावरी नदीच्या उगमापासून ते संगमापर्यंत दोन्ही तटांची प्रदक्षिणा गोदावरी परिक्रमा म्हणून सुप्रसिद्ध आहे.

(माहिती: विकिपीडिया)

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com