तपास यंत्रणेला सद्बुद्धी द्या; बीडमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचं अनोखं आंदोलन!

अवैध गर्भपात प्रकरणातील पोलिसांच्या तपासावर सामाजिक कार्यकर्त्यांचा संशय...
Social workers Agitation In Beed, Beed Latest Marathi  News
Social workers Agitation In Beed, Beed Latest Marathi Newsविनोद जिरे
Published On

विनोद जिरे

बीड: बीडमधील अवैध गर्भपात (Illegal abortion) प्रकरणात, पोलिसांच्या तपासावर सामाजिक कार्यकर्त्यांनी (Social workers) संशय व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणाची सीआयडीमार्फत (CID) व लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (ACB) चौकशी करावी, यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी "तपास यंत्रणेला सद्बुद्धी द्या", म्हणत बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोख आंदोलन केले आहे. (Beed Latest Marathi News)

Social workers Agitation In Beed, Beed Latest Marathi  News
बीजिंगच्या 'बार'मध्ये कोरोना विस्फोट! 166 जणांना लागण, मास टेस्टिंग सुरू

यावेळी मृत शितल गाडे प्रकरणातील गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करावी, तपासात हलगर्जीपणा बद्दल सहपोलिस निरीक्षक बाळासाहेब आघाव यांना निलंबित करा, संबंधित प्रकरणातील आरोपींची व नातेवाईकांच्या संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मार्फत चौकशी करा, मृत नर्स सीमा डोंगरे हिची आत्महत्या की हत्या ? याची सखोल चौकशी करा अश्या मागण्या करण्यात येत आहेत.

हे देखील पाहा-

त्यामुळे, काही प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली, बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर "तपास यंत्रणेला सद्बुद्धी" द्या, म्हणत अनोखं आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com