Copy In Government Exam: जलसंपदा विभागाच्या परीक्षेत कॉपी; सरकारी नोकरीसाठी विद्यार्थिनीचं संतापजनक कृत्य

Water Resources Department Exam: परीक्षेत वाशीम शहरातील गुलाटी टॉवरमधील डिजीटल परिक्षा केंद्रावर अमरावतीची एक मुलगी नक्कल करताना आढळून आली. त्यामुळे तिच्याविरोधात काल ३ जानेवारी रोजी वाशिम शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Copy In Government Exam
Copy In Government ExamSaam TV
Published On

मनोज जयस्वाल, वाशिम

Washim News:

शासकीय नोकरी मिळावी यासाठी सर्वच विद्यार्थी भरपूर प्रयत्न करतात. रात्रंदिवस अभ्यास करतात. मात्र तरीही अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळत नाही. अशात परीक्षेमध्ये पेपर सोडवत असताना कॉपी केल्याप्रकरणी एका विद्यार्थीनीवर कारवाई करण्यात आलीये. उत्तरे आधीच लिहून आनल्याने तिच्यावर गुन्हा दाखल झालाय. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Copy In Government Exam
Viral Video: बाळ दिसताच कुत्र्याने घातली झडप; चिमुकल्याला वाचवण्यासाठी आईची धडपड, काळजाची धडधड VIDEO

महाराष्ट्र जलसंपदा विभागाच्या गट क आणि गट ब प्रवर्गातील पदांसाठी 27 डिसेंबर 2023 ते 02 जानेवारी 2024 या कालावधीत ऑनलाईन परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षेत वाशीम शहरातील गुलाटी टॉवरमधील डिजीटल परिक्षा केंद्रावर अमरावतीची एक मुलगी नक्कल करताना आढळून आली. त्यामुळे तिच्याविरोधात काल ३ जानेवारी रोजी वाशिम शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

या परिक्षा केंद्रावर सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा तीन सत्रांमध्ये ऑनलाईन परिक्षा घेण्यात येत होती. २ जानेवारी रोजी सायंकळच्या सत्रात ऑनलाई परिक्षा देत असताना रश्मी सुरेशराव ठाकरे ही अमरावतीची विद्यार्थिनी कॉपी करताना परीक्षकांना आढळुन आली. कच्च्या कामासाठी आनलेल्या कागदाखाली उत्तरं लिहून आणलेला एक कागद तिच्याकडे आढळुन आला, त्यामुळं जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता तथा परीक्षा निरीक्षक शामकांत बोके यांनी या विद्यार्थीनी विरोधात वाशीम शहर पोलीस स्टेशमध्ये तक्रार दाखल केलीये.

महाराष्ट्र विद्यापीठाच्या, मंडळाच्या व इतर विनिर्दीष्ट परिक्षांमध्ये होणाऱ्या गैर प्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, 1982, कलम 7 अन्वये परिक्षार्थी रश्मीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आलाय. तर पुढील तपास वाशीम शहर पोलीस करीत आहेत.

दरम्यान, सदर ऑनलाईन परिक्षेचे आयोजन टी.सी.एस टाटा कंसल्टंशी सर्व्हिसेस या कंपनीकडून केले जात असून या विद्यार्थीनीला अगोदरच कुणीतरी पेपर दिला असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

Copy In Government Exam
Gurugram Crime News : दिव्या पाहुजा खून प्रकरणात हॉटेल मालकाचा धक्कादायक खुलासा, ब्लॅकमेल करत होती म्हणून...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com