Gautami Patil News: आर. आर. आबांच्या सांगलीत गौतमी नाचणार; पोलीस प्रशासनाने कार्यक्रमावर बंदी घालावी, कुणी केली मागणी?

Gautami Patil News: गौतमीचा आर आर पाटील यांच्या तासगाव तालुक्यात डान्सचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला स्वाभिमानी स्वराज्य सेनेला विरोध केला आहे.
Gautami Patil News
Gautami Patil NewsSaam tv

Gautami Patil News: लावणी डान्सर गौतमी पाटील आणि वाद हे एक समीकरणच झालं आहे . याच गौतमीचा दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या तासगाव तालुक्यात डान्सचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला स्वाभिमानी स्वराज्य सेनेने विरोध केला आहे. 'कायदा व सुव्यवस्था निर्माण करणार्‍या कार्यक्रमांना महाराष्ट्रात कायमस्वरूपी प्रशासनाने बंदी घालावी, अशी मागणी स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे नेते प्रशांत सदामते यांनी केली आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. आबा पाटील यांच्या सांगलीच्या तासगाव तालुक्यातील वायफळे येथे आज गौतमी पाटीलचा डान्सचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला स्वाभिमानी स्वराज्य सेनेने विरोध केला आहे.

Gautami Patil News
Gautami Patil Education: तरुणांना वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलचं शिक्षण आहे तरी किती? वाचून म्हणाल....

'गौतमीच्या डान्समुळे तरुणाईला बिघडवण्याचेच काम होणार आहे. ज्या आबांनी डान्सबार बंदीचा धाडसी निर्णय घेऊन महाराष्ट्र राज्यात एक आदर्श निर्माण केला. त्याच आबांच्या तालुक्यात उघड्यावर डान्स होणार आहे. पोलीस प्रशासनाने विचार करायला हवा. कोणत्या कार्यक्रमाला परवानगी देऊन पोलीस बंदोबस्त द्यायचा. हे खूप लाजिरवाणे आहे, अशी टीका स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या प्रशांत सदामते यांनी केली आहे.

'गौतमीच्या कार्यक्रमामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ज्या कार्यक्रमामुळे निर्माण होतो. गौतमीचे कार्यक्रम पोलिसांच्या समोर होणार आहेत. पोलीस बंदोबस्त असूनही तरुणांची हुल्लडबाजी होत असते. त्यामुळे पोलीस प्रशासनाने याचे भान राखले पाहिजे, सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, असे सदामते म्हणाले.

'कार्यक्रम उधळून लावून आम्हाला संयोजकांच्या गावच्या नागरिकांच्या भावना दुखवाल्या जाऊ नयेत, गाव पातळीवर असे कार्यक्रम घेतले जातात. इथून पुढे कायदा व सुव्यवस्था निर्माण करणार्‍या कार्यक्रमांना महाराष्ट्रात कायमस्वरूपी प्रशासनाने बंदी घातली पाहिजे, अशी मागणी सदामते यांनी केली आहे.

Gautami Patil News
Ankur Wadhave News: 'प्रिय बायको...'; अंकुर वाढवेने बायकोला वाढदिवसानिमित्त दिलं खास 'रोमँटिक सरप्राइज'

'पोलिसांनी देखील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जर वारंवार निर्माण होत असेल तर विचार करायला हवा, स्थानिक लोकप्रतिनिधींनी पण यावर विचार करायला हवा. येथून पुढे असे खाजगी कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, अशीही मागणी स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे प्रशांत सदामते यांनी केली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com