Gautami Patil : 'बर्थ डे आहे अश्विनचा...'; पैलवानाकडून चक्क बैलाच्या वाढदिवसाला गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन

चक्क गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमानंतर गावात चर्चेला उधाण आलं आहे.
Gautami Patil
Gautami Patil Saam TV
Published On

सातारा : सध्या सर्वत्र गौतमी पाटील ची चांगलीच हवा आहे.अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत गौतमी पाटीलने अक्षशः वेड लावले आहे. काही दिवसांपूर्वीच एका पाच वर्षाच्या मुलाच्या वाढदिवसाला गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन सातारा जिल्ह्यातील एका गावामध्ये केले होते. आता तर सातारा जिल्ह्यातील बैलगाडा मालक पैलवान सतीश भोसले यांनी महाराष्ट्र चॅम्पियन अश्विन या बैलाच्या वाढदिवसाला चक्क गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमानंतर गावात चर्चेला उधाण आलं आहे.

सतीश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आश्विन या त्यांच्या शर्यतीच्या बैलावर जीवापाड प्रेम आहे. दर वर्षी ते या बैलाचा वाढदिवस धूम धडाक्यात साजरा करत असतात. आज आश्विन या शर्यतीच्या बैलाचा तिसरा वाढदिवस (Birthday) आहे. या वाढदिवसानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करत असतात.

Gautami Patil
Gautami Patil Viral Video : गौतमी पाटीलचा 'हाय झुमका वाली पोर ' गाण्यावर हटके ठुमका; ओरिजिनल आणि हा डान्स एकदा बघाच

या वर्षी तर चक्क त्यांनी गौतमी पाटीलचाच (Gautami Patil) कार्यक्रम घेतल्याने गावकऱ्यांमध्ये मात्र चांगलच उत्साहाच वातावरण आहे. या कार्यक्रमाची जोरदार तयारी गावात सुरू आहे.गावामध्ये एका शेतात मोठं स्टेज उभरणीच काम सुरू आहे. संध्याकाळी सात वाजता हा कार्यक्रम असून या कार्यक्रमाची जय्यत तयारी गावात सुरू आहे.

Gautami Patil
Gautami Patil News: गौतमी पाटीलचा मुद्दा अधिवेशनातही गाजला; नेमकं काय झालं?

गौतमीच्या कार्यक्रमात होते तुफान गर्दी

लावणी डान्सर गौतमी पाटील ही कायमच चर्चेत असते. तिच्या कार्यक्रमाला होणारी मोठी गर्दी आणि त्यामधील वाद ही काही नवी बाब राहिलेली नाही. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात अनेकदा तुफान राडा झाल्याचे प्रकार घडले आहेत.

हुल्लडबाजांना आवरण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्जही करावा लागतो. त्यामुळे उपस्थित प्रेक्षकांची मात्र एकच पळापळ होते. तर आयोजकांना अनेकदा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागतो. तर अनेकवेळा मोठ्या बंदोबस्तात गौतमीला कार्यक्रम स्थळावरून बाहेर काढावे लागते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com