भूषण अहिरे
धुळे: साक्री Sakri तालुक्यामध्ये बनावट सोने विकणारी टोळी सक्रिय झाली होती. या टोळीतील काही जणांनी साक्री तालुक्यातील पिंपळनेर Pimpalner येथे राहणाऱ्या दीपक प्रभाकर भामरे यांना सोन्याचे पदक दाखवून याप्रमाणेच आणखी सोने Gold शेतामध्ये सापडले. तर ते देखील विकायचे आहे असे सांगून दीपक भामरे यांच्या कडून चार लाख रुपये घेऊन दीड किलो नकली सोने त्यांना दिले. नंतर त्या ठिकाणाहून पोबारा केला. त्यानंतर भामरे यांनी या दीड किलो सोन्याची पुष्टी केली असता हे नकली असल्याचे समजले. त्यांनी तात्काळ पिंपळनेर पोलीस Police ठाण्यामध्ये धाव घेतली. या संदर्भातील सर्व घटना पिंपळनेर पोलिसांना सांगितली.
हे देखील पहा-
त्यानंतर पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्याशी संपर्क साधला. झालेला संपूर्ण घटनाक्रम त्यांना सांगितला. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली. साक्री बायपास रोड लगत असलेल्या भंडारा हॉटेलच्या पाठीमागे काही नवीन लोक पालं ठोकून राहत असल्याची माहिती समोर आली. त्या अनुषंगाने पोलिसांनी त्यांचा तपास केला.
तपासादरम्यान त्यातील दोघा जणांच्या मुसक्या आवळन्यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे. या दोघांनी आपल्या सहकाऱ्यांसह हे कृत्य केले असल्याचे देखील कबुली दिली. तर तसेच त्यांच्याकडे तब्बल साडेसहा लाख रुपये रोकड सह नकली सोन्याचे नाणे देखील पोलिसांना मिळून आले आहे.
Edited By-Sanika Gade
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.