Ganeshotsav 2025: कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशभक्तांना टोलमाफी; पास कसा आणि कुठे मिळणार?

Ganesh Devotees Pass for Toll Free Journey: गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. कोकणात जाणाऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने टोलमाफी केली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.
Ganeshotsav 2025: कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी,  गणेशभक्तांना टोलमाफी; पास कसा आणि कुठे मिळणार?
Ganeshotsav 2025Saam Tv
Published On

Summary -

  • गणेशोत्सव २०२५ मध्ये कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी जाहीर.

  • २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान लागू होणार सवलत.

  • ‘गणेशोत्सव २०२५ - कोकण दर्शन पास’ आवश्यक.

  • शासन निर्णयामुळे गणेशभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण.

गणेशोत्सवसाठी कोकणामध्ये जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने गणेशभक्तांना मोठा दिलासा देत टोलमाफी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही मोठी घोषणा केली. महत्वाचे म्हणजे गणेशभक्तांना कोकणामध्ये जाण्यासाठी पास मिळवण्यासाठी यंत्रणाही उभी करण्यात आली आहे. या पासद्वारे गणेशभक्तांना कोकणात जाताना आणि परतीच्या प्रवासादरम्यान टोलमाफी मिळणार आहे.

यंदाच्या गणेशोत्सवामध्ये कोकणामध्ये जाणाऱ्या गणेशभक्तांना महाराष्ट्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी टोलमाफी करण्यात आली आहे. आज उमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीमध्ये मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग तसंच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारितमध्ये येणाऱ्या सर्व टोलनाक्यांवर गणेशभक्तांना टोलमाफी करण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणारी वाहनं आणि एसटी बसेस यांना टोलमाफीचा फायदा मिळणार आहे.

Ganeshotsav 2025: कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी,  गणेशभक्तांना टोलमाफी; पास कसा आणि कुठे मिळणार?
Ganeshostav 2022 | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर प्रशासन सज्ज, अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी

यंदाच्या वर्षी कोकणामध्ये गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांना 'गणेशोत्सव २०२५ - कोकण दर्शन'या नावाने विशेष टोलमाफी पास देण्यात येणार आहे. या पासवर वाहन क्रमांक आणि वाहन मालकांची माहिती नोंदवली जाणार आहे. हा पास असणाऱ्यांनाच टोलमाफी मिळणार आहे. हे पास गणेशभक्तांना संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलिस व वाहतूक विभागाकडे मिळतील. परतीच्या प्रवासासाठी देखील हेच पास ग्राह्य धरले जाणार आहेत.

Ganeshotsav 2025: कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी,  गणेशभक्तांना टोलमाफी; पास कसा आणि कुठे मिळणार?
Ganeshostav 2023 : कोकणात जाणाऱ्यांसाठी भाजपकडून खुशखबर, मुंबईतून 6 ट्रेन आणि 250 बसेसची सोय करणार

कोकणामध्ये जाणाऱ्या गणेशभक्तांना हे पास वेळेत मिळावेत असे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. शासनाच्या आदेशानुसार ग्रामीण व शहरी पोलिस तसेच प्रादेशिक परिवहन विभागाने हे पास वाटपाचे समन्वय साधून गणेशभक्तांना ते वेळेत उपलब्ध करून द्यावेत असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे गणेशभक्तांनी स्वागत केले आहे. टोलमाफीच्या निर्णयामुळे गणेशभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Ganeshotsav 2025: कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी,  गणेशभक्तांना टोलमाफी; पास कसा आणि कुठे मिळणार?
Ganeshostav 2023 : मुंबईत 10 दिवस रात्रभर बिनधास्त फिरा, गणेशोत्सवात रात्री विशेष बसेसची सोय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com