Ganeshotsav 2021: जालण्यात राजेश टोपे यांच्या घरीही बाप्पाचं आगमन

राज्याचे आरोग्यमंत्री आणि जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या जालन्यातील घरीही गणपती बाप्पाचं आगमन झालंय.
Ganeshotsav 2021: जालण्यात राजेश टोपे यांच्या घरीही बाप्पाचं आगमन
Ganeshotsav 2021: जालण्यात राजेश टोपे यांच्या घरीही बाप्पाचं आगमनलक्ष्मण सोळुंके
Published On

लक्ष्मण सोळुंके

जालना : राज्याचे आरोग्यमंत्री आणि जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे Rajesh Tope यांच्या जालन्यातील Jalna घरीही गणपती बाप्पाचं आगमन झालंय. राजेश टोपे यांनी आज सकाळी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापणा केली आहे. यावेळी टोपे यांच्या कुटुंबातील सदस्य देखील उपस्थित होते. बाप्पाची प्रतिष्ठापना केल्यानंतर टोपे यांनी बाप्पाची मनोभावे आरती करून लाडक्या बाप्पाचं स्वागत केलं.

हे देखील पहा-

दरम्यान, गणपती बाप्पा आज सर्वत्र विराजमान होणार आहे. राज्यात मोठ्या धुमधडाक्यात गणपती उत्सव साजरा केला जातो. आज लाडक्या गणरायाचे आगमन झालय. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या निवासस्थानी देखील गणरायाचे आगमन झाल आहे.

Ganeshotsav 2021: जालण्यात राजेश टोपे यांच्या घरीही बाप्पाचं आगमन
Raigad: गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात; घरोघरी गणरायाचे आगमन

बाप्पाचं आगमन झाल्यावर पुढचे दहा दिवस बाप्पाची पूजा-चर्चा, वेगवेगळे सोपस्कार पार पाडले जाणार आहेत. पण यंदा कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर साधेपणानेच गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यानुसार सगळ्या नातेवाईक आणि आप्तस्वकीयांनी घरी न येता थेट ऑनलाइन दर्शन घ्यावे असे आवाहन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर कोरोनाच सावट यंदा आहे , त्याला गणेशोत्सवात निर्बंध आहेत , पण पुढच्या वर्षी बाप्पाचे आगमन होताना हे निर्बंध नको , म्हणून लवकरात लवकर कोरोना जावं अशी प्रार्थना बापाकडे आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com