ST Bus Strike: धुळ्यातील एसटी कर्मचाऱ्यांची गांधीगिरी: रक्तदान करून आंदोलन सुरूच

धुळ्यातील एसटी कर्मचारी आंदोलकांनी रक्तदान करून गांधीगिरी पद्धतीने राज्य शासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे.
ST Bus Strike: धुळ्यातील एसटी कर्मचाऱ्यांची गांधीगिरी: रक्तदान करून आंदोलन सुरूच
ST Bus Strike: धुळ्यातील एसटी कर्मचाऱ्यांची गांधीगिरी: रक्तदान करून आंदोलन सुरूचभूषण अहिरे

धुळे: एसटी महामंडळाचे (MSRTC) राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये एसटी कामगारांतर्फे आंदोलन सुरू (Agitation) आहे. एकीकडे राज्यशासन हे आंदोलन दडपण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, मात्र दुसरीकडे धुळ्यातील एसटी कर्मचारी आंदोलकांनी रक्तदान (Blood Dination) करून अनोख्या पद्धतीने राज्य शासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे. संपावर जाण्याआधी एसटी कर्मचारी नागरिकांना ज्या पद्धतीने सेवा देत होते, त्याच पद्धतीने संपावर (Strike) गेल्यानंतर देखील रुग्णांना भासणार्‍या रक्ताचा पुरवठा आरोग्य विभागाला करून अनोख्या पद्धतीने नागरिकांची सेवा सुरूच ठेवण्याचा प्रयत्न या संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. (Gandhigiri of ST workers in Dhule: The agitation continues by donating blood)

हे देखील पहा -

एसटी कर्मचाऱ्यांचे सुरू असलेले आंदोलन दडपण्यासाठी राज्य शासनातर्फे निलंबनाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे. राज्य शासनातर्फे आंदोलन दडपण्याचा कितीही प्रयत्न झाला तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये एसटी कर्मचारी संप मागे घेणार नाही असा पावित्रा या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com