... त्यामुळे राज्यातील या ९ जिल्ह्यामध्ये इंधनाचा तुटवडा भासणार

गायगाव डेपोच्या सर्व १८०० इंधन टँकर वाहतूकदारांनी आज शुक्रवार पासून बेमुदत संप सुरू केला आहे.
... त्यामुळे राज्यातील या ९ जिल्ह्यामध्ये इंधनाचा तुटवडा भासणार
... त्यामुळे राज्यातील या ९ जिल्ह्यामध्ये इंधनाचा तुटवडा भासणारअॅड.जयेश गावंडे
Published On

अकोला : अकोला ते निंबा या मार्गावर असलेल्या गायगाव इंधन डेपो मधील इंधन टँकर वाहतुकदारांनी (Fuel tanker carrier) आज पासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे इंधनाची वाहतूक पूर्णतः ठप्प झाल्याने याचा फटका नऊ जिल्ह्यातील पेट्रोल पंपाना बसण्याची शक्यता आहे. (fuel shortage in these 9 districts of the state)

हे देखील पहा -

अकोला ते निंबा फाटा मार्गावर (Akola to Nimba Way) दहा - पंधरा फुट आकाराचे मोठ मोठे खड्डे पडले असून या रस्त्यांबाबत कोणताही तोडगा न निघाल्याने गायगाव डेपोच्या सर्व १८०० इंधन टँकर वाहतूकदारांनी आज शुक्रवार पासून बेमुदत संप सुरू केला आहे. या संपाचा परिणाम राज्यातील ९ जिल्ह्यांतील पेट्रोल पंपांवर (Petrol Pump) होणार असून इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

... त्यामुळे राज्यातील या ९ जिल्ह्यामध्ये इंधनाचा तुटवडा भासणार
मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहलेल्या 'त्या' पत्राच जयंत पाटलांकडून समर्थन

रिपब्लिकन टँकर चालक व वाहन युनियनच्या (Republican Tanker Drivers and Vehicle Union) टँकरचालकांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या इशाऱ्यानुसार आज पासून हा संप पुकारला आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक शासकीय कार्यालयाचे उंबरठे झीजवूनही रस्ता दुरुस्त होत नसल्याने टँकर चालकांनी संप पुकारण्याचा पावित्रा घेतला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com