गोकुळाष्टमी निमित्त विठ्ठल मंदिरात फळा फुलांची सजावट

फळा फुलांच्या सजावटीने देव नटला आहे.
गोकुळाष्टमी निमित्त विठ्ठल मंदिरात फळा फुलांची सजावट
गोकुळाष्टमी निमित्त विठ्ठल मंदिरात फळा फुलांची सजावटSaam Tv
Published On

पंढरपूर - गोकुळाष्टमीच्या निमित्ताने आज पंढरपूर Pandharpur येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध फळांसह देशी-विदेशी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. हवेली येथील भाविक पांडूरंग मोरे Pandurang More यांच्या वतीने ही सजावट करण्यात आली आहे. फळा फुलांच्या सजावटीने देव नटला आहे.

हे देखील पहा -

देवाचा गाभारा, प्रवेश द्वार , सोळखांबी, सभामंडप यासह संपूर्ण मंदिर फुलांनी सजविण्यात आले आहे. झेंडू, आर्किड, कारनेशियन, शेवंती, कामिनी, गुलाब,‌ आष्टर,‌ जिप्सोफेलिया,‌ तुळस, गड्डी फुले आशा 2000 किलो देशी‌ विदेशी फुलांचा आणि पानांचा वापर करुन मंदिर सजवण्यात आले आहे. तर मोसंबी, सफरचंद,अननस,सिताफळ, कलिंगड,संत्री अशा 500 किलो फळांचा वापर या सजवटीसाठी करण्यात आला आहे. रंगबेरंगी‌ फुलं आणि विविध फळांच्या सजावटी मुळे देवाचे‌‌ रुप‌ अधिकच खुलून दिसत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com