Nagpur Marathi News : महानगरांमध्ये जलवाहिनी, सांडपाणी पाईपलाईन खराब होणे, लिकेज होणे, फुटने यासारख्या समस्या नेहमीच उद्भवत असतात. मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये तर याचा सर्वाधिक त्रास होतो. अशा वेळी त्या दुरुस्ती करताना बरीच दमछाक होते. नेमकी पाईपलाईन कुठे खराब आहे, लिकेज आहे याची खात्रीशीर माहिती मिळत नाही.
नागपुरातील 'निरी' अर्थात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेनं एक असं सॉफ्टवेअर विकसित केलंय ज्यामुळं बसल्या जागी कळेल की नेमकी कुठे जलवाहिनी, मलवाहिनी खराब आहे किंवा लिकेज आहे. (Latest Marathi News)
निरीचे शास्त्रज्ञ आभा सारगावकर आणि आशिष शर्मा यांनी हे 'रिस्क पीनेट 2.0' हे सॉफ्टवेअर विकसित केलंय. गणितीय आधारावर हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आलं आहे. शहरातील सर्व जलवाहिन्या, मलवाहिन्या यांचा एक डेटा तयार करण्यात आला. यासाठी त्यांनी 'सॅफ्रा डब्लूडीएस' नावाचे पोर्टल तयार केलं. (Nagpur News)
यात शहरातील कुठे कुठे पाईपलाईन आहे, किती वर्षे जुने आहे, किती व्यासाचे आहे, किती प्रेशर आहे, कधी बदलले पाहिजे याची नकाशा सह संपूर्ण माहिती टाकण्यात आलीय. हे पोर्टल 'रिस्क पीनेट' शी जोडण्यात आले आहे.
त्यामुळं जलवाहिनी आणि सांडपाणी पाईपलाईन ची अचूक माहिती मिळते आणि काही अडचण असल्यास ती त्वरित दुरुस्त करता येते. नागपूर (Nagpur) महापालिकेसह चेन्नई, हैदराबाद आणि वर्धा प्रशासनाने या सॉफ्टवेअरचे यशस्वी प्रयोग केले आहे. भारतातील एकमेव संशोधन असून व्यावसायिक वापरासाठी तयार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.