मॅट्रिमोनी साईट वरून वीज कर्मचाऱ्याची 40 लाखांची फसवणूक !

नागपूरच्या बेलतरोडी पोलीस स्टेशन हद्दीत एका वीज कर्मचाऱ्याची 40 लाखांची फसवणूक झाल्याच प्रकरण समोर आले आहे. माहिती प्रमाणे एक लाख डॉलरसाठी 40 लाख रुपये गमवावे लागले आहेत.
मैट्रिमोनी साईटवरून वीज कर्मचाऱ्याची 40 लाखांची फसवणूक !
मैट्रिमोनी साईटवरून वीज कर्मचाऱ्याची 40 लाखांची फसवणूक ! मंगेश मोहिते
Published On

मंगेश मोहिते

नागपूर: नागपूरच्या बेलतरोडी पोलीस स्टेशन हद्दीत एका वीज कर्मचाऱ्याची 40 लाखांची फसवणूक झाल्याच प्रकरण समोर आले आहे. माहिती प्रमाणे एक लाख डॉलरसाठी 40 लाख रुपये गमवावे लागले आहेत. कथित अमेरिकन महिलेने वीज कर्मचाऱ्यांला गंडविले असा प्रकार सांगण्यात येत आहे. Fraud of Rs 40 lakh from power employee from matrimony site

अमेरिका वरून एक लाख डॉलर भेट म्हणून पाठवण्याची बतावणी करून एका व्यक्तीची 40.64 लाखाने फसवणूक केल्याची घटना उघड झाली आहे. बेलतरोडी Beltrodi पोलिसांनी कथित महिलेसह 16 आरोपी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सायबर आय टी एक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी या प्रकरणात चौकशी सुरु केली आहे. सुचिता दास, असटीन व्हाईट न्यू जर्सी,(अमेरिका), महिमा शर्मा,प्रसतो अधिकारी,नदीम खान, शंकर कुमार दिवेदी,भोलानाथ,अजय शाह, ओमपाल सिंह,सुशील नागर, फिरदौस, अजय कुमार,विक्रम सैनी,ताराचंद लुहार आणि जार्जे अपोलिणारी यांच्या वर गुन्हा दाखल केला आहे.

हे देखील पहा-

सुनील सुनील देऊळवार (वय 45) हे वीज विभागात MSEB कार्यरत आहेत. त्यांचा लहान भाऊ सुशीला विवाहित आहे. सुनीलने सुशील साठी वधू शोधण्यासाठी ऑक्टोबर 2019 मध्ये भारत मॅट्रिमोनी वेबसाईटवर अकाउंट तयार केले. या अकाउंटवर न्यू जर्सी अमेरिका America येथील कथित सुचिताने संपर्क साधला. हे अकाउंट सुनील संचालित करत होता. त्यावेळेस कथित सुचिताने सुनील यांच्यासोबत चॅटिंग सुरु केली.

पुढे तिने सुशील सोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. तिने आपले कुटुंबीय धनादेश असून लग्नात कोणतीही भेटवस्तू घेण्यास नकार दिला. त्यामुळे सुनील सुचिता चॅटिंग प्रभावित झाले. तिने सुनीलला आपल्यासाठी पूजा करण्यास सांगितले. तिने सुनीलला 1 लाख रुपये कुरियरने भेट देण्याची बतावणी केली होती. Fraud of Rs 40 lakh from power employee from matrimony site

तिने कुरियरने डॉलर पाठवण्यापूर्वी खोट्या डॉलरच्या फोटो सुनीलला पाठवल्यामुळे सुनीलला तिच्यावर विश्वास बसला. त्यानंतर दिल्लीहून Delhi कथित कस्टम अधिकारी Officer तथा महिमा शर्मा नावाच्या महिलेसह अनेकांचे फोन येऊ लागले. त्यांनी सुनीलला तुमचे पार्सल दिल्लीला पोहोचल्याचे सांगितले. पार्सल सोडविण्यासाठी त्यांनी सुनीलला कस्टम ड्युटी द्यावी लागणार असल्याचे सांगितले. तसे न केल्यास त्यांना दंड Penalty भरावा लागणार असल्याचे सांगितले.

मैट्रिमोनी साईटवरून वीज कर्मचाऱ्याची 40 लाखांची फसवणूक !
काशीद पूल दुर्घटनेत भायदेच्या हुशारीने वाचविले स्वतःचे कुटूंब

तसे न केल्यास त्यांना दंड भरावा लागणार असून पोलीस कारवाई होऊ शकते अशी धमकी दिली. एक लाख डॉलरची किंमत भारतात 75 लाख रुपये आहे. त्यामुळे सुनील यांनी कस्टम ड्युटी देण्याची तयारी सुद्धा दर्शवली. सांगितल्याप्रमाणे पैसे ट्रान्सफर केले. Fraud of Rs 40 lakh from power employee from matrimony site

दोन वेगवेगळ्या नावाच्या क्रमांकाने सुनीलला फोन करून वेगवेगळे शुल्क जमा करण्यासाठी ते दबाव Force टाकू लागले. तसे न केल्यास तुरुंगात जावे लागेल अशी धमकी दिली. त्यामुळे सुनील ने एनइएफटी ,आरटीजीएस तसेच यूपीआयच्या माध्यमातून 40.64 लाख रुपये आरोपीस पाठविले. सुनील विज विभागत ऑपरेटर आहेत. त्यामुळे त्यांनी वडिलोपार्जित संपत्तीतून मिळालेली रक्कम आरोपींना पाठविली होती. त्यांना आणखी पैसे देण्यात नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांच्याशी संपर्क तोडला याबाबत पोलीसात Police तक्रार नोंदविली पोलिसांनी फसवणूक आयटी अकॅट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

आरबीआयच्या नावाने फसवणूक:

सुनील देऊळवार यांची फसवणूक करण्यासाठी आरोपींनी आरबीआयच्या RBI नावाने पैसे जमा करण्याचा बनावट ई-मेल पाठविला. या ई-मेलमुळे E Mail सुनीलला शुल्क शासनाकडे Government जमा झाल्याचा भरवसा पटला. आरोपींनी सातत्याने पैसे मगितल्यामुळे सुनील चौकशी केली असता त्यांना आरबीआयने हा ई-मेल पाठविला नसल्याची माहिती मिळाली. सायबर गुन्हेगारांनी अनेकदा या पद्धतीने फसवणूक केली आहे. वेळोवेळी अशा घटना घडूनही नागरिक आरोपींच्या जाळ्यात सापडतात.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com