
अभिजीत घोरमारे
भंडारा - भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यापासून जवळच असलेल्या पिंडकेपार येथे दिलीप नंदेश्वर यांच्या घरी अतिशय दुर्मिळ प्रजातीचा 3 फूट लांबी असलेला मांजऱ्या साप (फ़ॉस्टेन कॅट स्नेक) ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनी-साकोली येथील सर्पमित्रांना आढळला असून यापूर्वी मागील 17 वर्षात फक्त दोनदा हा साप या भागात आढळलेला होता. Forsten's cat snake found in Bhandara after 17 years
हे देखील पहा -
बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा चांगल्या स्थितीत आढळलेला हा मांजऱ्या साप बघून सर्पमित्रांमध्ये अतिशय आनंदाची लहर पसरली आहे. हा निमविषारी गटात गणला जाणारा साप असून त्याची सरासरी लांबी 70 सेंमी ते 125 सेंमी असते. त्याचे डोके गोल कडा असलेले त्रिकोणी आकारचे असून मानेवर वाय किंवा गॅमा चिन्हासारखी खूण तसेच डोळ्याच्या बाहुल्या मांजराप्रमाणे तसेच उभ्या रचनेत असतात.
याशिवाय या सापाच्या अंगावर मांजराच्या त्वचे सारखा रंग आणि चट्टे असल्याने हा मांजऱ्या साप किंवा कॅट स्नेक म्हणून ओळखला जातो. या मांजऱ्या सापामध्ये विशेषकरून दोन रंग बघायला मिळतात एक लालसर तपकीरी रंग तर दुसरा करडा रंग, फॉस्टेन कॅट स्नेक हा सहज आढळणारा साप नसून हा झाडाच्या छिद्रात, घरट्यात, ढोलीत विशेषतः आढळतो.
याचे खाद्य पाल, सरडे, बेडूक इत्यादी प्रकारचे आहे. सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या मांजऱ्या प्रजाती सापामध्ये कॉमन कॅट स्नेक (साधा मांजऱ्या साप) सर्वत्र आढळतो पण फॉस्टेन कॅट काही विशिष्ट भागातच आढळत असल्याची माहिती ग्रीनफ्रेंड्सच्या सदस्यांनी दिली आहे.
Edited By : krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.