Nanded: माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांचं निधन; वयाच्या ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भोकर विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी दोनवेळा प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे मतदारसंघात त्यांचा चांगलाच प्रभाव होता. आपल्या मतदारसंघावरदेखील त्यांची चांगलीच पकड होती.
Sriniwas Alias Bapusaheb Gorthekar Deshmukh
Sriniwas Alias Bapusaheb Gorthekar DeshmukhSaam TV

नांदेड: राष्ट्रवादी कांग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे माजी आमदार श्रीनिवास उर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर (Srinivas Alias Bapusaheb Balajirao Gorthekar Deshmukh) यांच निधन (Death) झालं आहे. बुधवारी रात्री ९ वाजता नांदेडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना गोरठेकरांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Nanded Latest News)

हे देखील पाहा -

Sriniwas Alias Bapusaheb Gorthekar Deshmukh
मुंबईतील गणेश मंडळांसाठी महत्वाची बातमी; मंडप परवानगीची मुदत 'या' तारखेपर्यंत वाढवली

बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि आमदार पद भुषवले होते. शब्द पाळणारा, प्रामाणिक नेता म्हणून त्यांची ओळख होती. विरोधक असलेले बापूसाहेब गोरठेकर यांनी २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश करत भोकर मतदार संघातून अशोक चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत गोरठेकर यांचा पराभव झाला होता. त्यानंतर मागील वर्षी गोरठेकर पुन्हा राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसमध्ये गेले. काही दिवसांपासून गोरठेकर आजारी होते. आज, गुरुवारी दुपारी ४ वाजता गोरठा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुलं आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com