काटोलच्या भारत राखीव बटालियनला मंजुरी; अनिल देशमुखांनी पाहिलं होतं स्वप्न

Indian Reserve Battalion : भारत राखीव बटालियन व्हावी यासाठी अनिल देशमुख यांनी प्रस्ताव तयार केला होता.
Indian Reserve Battalion Katol
Indian Reserve Battalion KatolSaam Tv
Published On

मुंबई : काटोल येथे मोठी बटालियन व्हावी असं स्वप्न माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी पाहिलं होतं. आता त्यांचं हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे भारत राखीव बटालियनला (Indian Reserve Battalion) मंजूरी देण्यात आली आहे. भारत राखीव बटालियन व्हावी यासाठी अनिल देशमुख यांनी प्रस्ताव तयार केला होता. ही बटालियन मंजुर होण्यासाठी राष्ट्रवादीचे युवा नेता जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख (Salil Deshmukh) यांनी सात्यत्याने प्रयत्न सुरुच ठेवले होते. गुरुवारला मंत्रालयात या संर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) यांच्या दालनात अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. यात काटोल तालुक्यातील इसासनी येथे भारत राखीव बटालियनला ५ ला मंजुरी देण्यात आली असून तसा शासन निर्णय सुध्दा काढण्यात आल्याची माहिती सलील देशमुख यांनी दिली. या निर्णयाबदल सलील देशमुख यांनी महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहे.

Indian Reserve Battalion Katol
शरद पवारांना धमकीचं ट्विट; राष्ट्रवादीकडून सायबर सेलमध्ये तक्रार

काटोल तालुक्यात बटालियन होण्यासाठी अनिल देशमुख यांनी प्रयत्न सुरु केले होते. यासाठी ईसासनी येथे १२० एकर शासकीय जमीन सुध्दा हस्तांतरीत करण्यात आली होती. येथे महिला बटालियन होण्याचा प्रस्तावही तयार करण्यात आला होता. त्यास मंजुरी सुध्दा देण्यात आली होती. परंतु मध्यंतरी यात काही तांत्रिक अडचणी येत गेल्यामुळे भारत राखीव बटालियनचा प्रस्ताव समोर आला. सुरुवातीला ही बटालियन अकोला जिल्हातील शिसा उदेगाव व हिंगाणा शिवारात होणार होती. परंतु येथे जमीन उपलध्ध होत नसल्याने या बटालियनचा प्रस्ताव धुळखात पडला होता. नागपूर हे शहर महाराष्ट्राची उपराजधानी असुन देशाच्या मध्यवर्ती आहे. सदर भारत राखीव बटालियन हे केंद्र शासनाच्या अधिपत्याखालील असल्याने त्यांची गरज देशात इतरत्र लागल्यास तातडीने इतर राज्यात तैनातीसाठी पाठविण्यास सुकर होण्यासाठी ती अकोला ऐवजी नागपूर येथे घेण्याचा प्रस्ताव समोर आला.

नागपूर शहर हे मध्यवर्ती ठिकाण असुन दळणवळणासाठी रेल्वे, विमान व महामार्ग यांनी जोडले असल्याने प्रवासाच्या दुष्टीने सोयीस्कर आहे. भारत राखीव बटालियन मधील अधिकारी व कर्मचारी यांच्या कंपन्या वारंवार पूर्ण संख्याबळासह नक्षल बंदोबस्त, आंतरसुरक्षा बंदोबस्त , राज्याबाहेरील बंदोबस्ताकरिता पाठविण्यात येतात. अशा परिस्थीतीत भारत राखीव बटालियनचे ५ कार्यालय नागपूर येथे असल्यास सोईस्कर होणार आहे. ही बटालियन काटोल येथे होण्यासाठी गृहमंत्री असतांना अनिल देशमुख यांनी प्रयत्न सुरु केले होते. या बटालिनचा पाठपुरावा सलील देशमुख सात्यत्याने घेत होते.

Indian Reserve Battalion Katol
CM उद्धव ठाकरेंना किरीट सोमय्यांचं पुन्हा खुलं आव्हान

यासाठी गुरुवारला मंत्रालयात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत गृहसचिव आनंद लिमये, पोलीस हॉवसींगचे पोलिस महासंचालक विवेक फणसाळकर, संजय वर्मा, पंकज डाहाने, एसआरपीएफचे एडीजी चिरंजीव प्रसाद, नागपूरचे विषेश पोलिस महानिरीक्षक शेलींग दोरजे, नागपूर ग्रामिणचे अधिक्षक मगर, सलील देशमुख अपुन खराडे, शब्बीर शेख, माणिक नाईक यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत सर्व तांत्रिक अडचणीवर चर्चा करण्यात आली. जागा हस्तांतरीत करण्याचा प्रस्ताव सुध्दा तयार करण्यात आला असून २२ मार्च २०२२ ला आदेश सुध्दा काढण्यात आल्याचे या बैठकीत समोर आले. सर्व बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आल्यानंतर अकोला येथील मंजुर पदांसह व मंजुर आवर्ती आणि अनावर्ती खर्चासह भारत राखीव बटालियन क्र. ५ ला काटोल तालुक्यातील ईसासनी येथे स्थापन करण्याची मान्यता देण्यात आली. याबाबतचा शासन निर्णय सुध्दा काढण्यात आला. भारत राखीव बटालियन क्र. ५ ला काटोल येथे मान्यता दिल्याबदल सलील देशमुख यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com