ज्या नेत्याने बळ दिलं, संधी दिली, त्याचं इमान राखू शकले नाहीत; राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

'ज्या नेत्याने बळ दिलं, ज्याने घडविले, संधी दिली, त्यांचे इमान राखू शकले नाहीत, त्या नेत्याला अशा पद्धतीने सोडून जाणे दुर्दैवी.'
Eknath Shinde News, Uddhav Thackeray News
Eknath Shinde News, Uddhav Thackeray NewsSaam TV
Published On

नागपूर : माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी आज नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला, 'ज्या नेत्याने बळ दिलं, ज्याने घडविले, संधी दिली, त्याचे इमान राखू शकले नाहीत, त्या नेत्याला अशा पद्धतीने सोडून जाणे दुर्दैवी असून शिंदे गटाचा आरोप राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर (Congress) होता तर मग ते अडीच वर्षे काय केलं हा प्रश्न निर्माण होत असल्याचंही राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले, नागपूरमध्ये मुंबईनंतर सर्वाधिक कोविड (Covid-19) रुग्णांची संख्या होती, आम्ही कोविड नियंत्रणात आणला. कोविड संपल्यावर इतर विकास कामांना प्राधान्य दिलं, लॉ युनिव्हर्सिटी, IIM, IIT सारखे इन्स्टिट्यूट आणले.

पाहा व्हिडीओ -

ऊर्जामंत्री असताना वीज निर्मिती वर भर दिला. २७ पॉवर प्लांट पुनर्जीवित केले, कोळसा तुटवड्यावर मात करत भारनियमन होऊ दिले नाही. राज्य सरकारने निधी दिला नाही, आम्ही कर्ज घेऊन वीज प्रकल्पाचा गाढा चालविला. महावितरण नफ्यात आणलं, गुड गव्हर्नन्सचा देशातील मोठा पुरस्कार मिळाला.

विकास कामांसाठी लढावं लागलं, झगडावं लागलं, कोणताही विभाग सोडला नाही सर्व विभागात कामं केली. विरोधक म्हणून कामं करायची नाही असं कधीच केलं नाही. तसंच ११ हजार कोटींचे काम माझ्या विभागात केलं. साडेअकरा हजार मेगावॉट वीज निर्मिती चे लक्ष पूर्ण केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Eknath Shinde News, Uddhav Thackeray News
'विश्वासदर्शक ठरावाला आम्ही गेलो असतो तरी...', विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं गैरहजेरीचं कारण

वीज माफीसाठी केंद्र सरकारला १० हजार कोटी रुपये बिनव्याजी मागितले होते, मात्र त्यांनी ते दिले नाही. तसंच उर्जा विभागाची स्थिती चांगली नसल्याने आम्ही कर्ज माफ करू शकलो नाही. दोन वर्षे कोरोनामुळं काम करायला मिळाली नाही, आता सुरुवात झाली होती, मात्र सरकार पडलं, आता सध्याचं सरकार विदर्भाचा विकास करेल का हे बघू असंही ते यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com