
अहमदनगर : तालुक्यातून जाणाऱ्या नगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा भूसंपादन होत असलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला आमदार रोहित पवार धावले आहेत. या बाबत संबंधित अधिकाऱ्यांना समवेत घेत थेट गावात जात तक्रारी व अडचणी एकूण घेतल्या. त्यावर योग्य आणि सर्वमान्य तोडगा काढण्याचे आदेश त्यांनी दिले आहे.
या वेळी जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे, कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड. कैलास शेवाळे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे, जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ काळदाते, परमवीर पांडुळे, श्यामभाऊ कानगुडे, नितीन खेतमाळस, मनोज खेडकर, रामदास चौघुले, सावन शेटे यांच्यासह ग्रामस्थ तर प्रांत अर्चना नष्टे, भूसंपादन अधिकारी ज्योती अवताडे, उपअभियंता अमित निमकर, तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, गट विकास अधिकारी रुपचंद जगताप आदी उपस्थित होते.Follow-up of Vikhe Patil for Nagar-Solapur highway
आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील मांदळी, थेरगाव, नागमठाण, घुमरी, कोकणगाव, मिरजगाव, बाभूळगाव खालसा, नागलवाडी, माही, जळगाव, पाटेगाव,पाटेवाडी, निमगाव डाकू व चापडगाव या गावांतील भूसंपादनाबाबत लाभार्थ्यांच्या अडीअडचणीसाठी बैठक घेण्यात आली. या वेळी लाभार्थींनी विविध अडचणी व तक्रारी निदर्शनास आणून दिल्या. त्या बाबत आ. पवार आणि प्रांत अर्चना नष्टे यांनी यावर उचित कार्यवाही करण्यात येईल असे उपस्थितांना सांगितले.
शेतकऱ्यांमागे उभे राहू
आमदार रोहित पवार म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय दळणवळण मंत्र्यांच्या प्रयत्नातून नगर-करमाळा मार्गाचे काम होत आहे. त्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा केला आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीदेखील पाठपुरावा केला आहे. विकासासाठी दळणवळण सुविधा त्यासाठी दर्जेदार रस्ते होणे गरजेचे आहे. नगर-करमाळा रस्त्याच्या भूसंपादनात कुणावर अन्याय होणार नाही. यासाठी आपण खंबीरपणे पाठिशी उभे राहू. प्रांताधिकारी नष्टे म्हणाल्या, या बाबत सर्वांच्या तक्रारी वा अडचणी सोडवल्या जातील.Follow-up of Vikhe Patil for Nagar-Solapur highway
पुन्हा होणार सर्व्हे
नगर-करमाळा रस्त्याच्या भूसंपादनाबाबत रस्त्याच्या दुतर्फा, तसेच बाह्यवळण रस्ता या दराबाबत तफावत, तसेच मालमता व इतर नोंदी नसल्याबाबत अनेकांनी आक्षेप नोंदविले. मात्र, जेथे अडचणी असतील, तेथे पुन्हा सर्व्हे करण्यात यावा, असे आ. पवार यांनी सांगितले. त्यावर कार्यवाही करण्याचे प्रांताधिकारी नष्टे यांनी स्पष्ट केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.