टेंभू जलसिंजन प्रकल्पाच्या पुलाला टेकले पुराचे पाणी

टेंभू प्रकल्प हा कोरेगांव आणि टेंभूच्या सीमेवरती असणारा हा प्रकल्प आणि कृष्णा कोयना या दोन्ही नद्यांचे मिळून पाणी या धरणाला येऊन मिळते.
टेंभू जलसिंजन प्रकल्पाच्या पुलाला टेकले पुराचे पाणी
टेंभू जलसिंजन प्रकल्पाच्या पुलाला टेकले पुराचे पाणीJagdish Patil
Published On

संपुर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊसाने थैमाण घातलं आहे. मात्र कालपासून पाऊसाने जास्तच रौद्ररुप धारणं केलं आहे. आणि यामुळेच आज सकाळपासूनच महाडमधील तळीये गाव पासून ते सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा ठिकाणी दरडी कोसळून लोकांचा मृत्यू झाला आहे. Floodwaters hit the bridge of Tembhu Irrigation Project

यासगळ्या परिस्थितीतच आज सातारा ता. कराड मधील टेंभू(Tembhu Irrigation Project) धरणाचा पुलाला पाणी लागल्याची आणि कराडमधील यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) स्मृतीस्थळानजीक आलेल्या पाण्याची चर्चा कराडकरांच्या चर्चेचा विषय बनली आहे.

टेंभू प्रकल्प हा कोरेगांव(Koregaon) आणि टेंभूच्या सीमेवरती असणारा हा प्रकल्प आणि कृष्णा कोयना या दोन्ही नद्यांचे मिळून पाणी या धरणाला येऊन मिळते. तर याच प्रकल्पाजवळ ग्रामदेवता अंबाबाईच सुप्रसिध्द असे मंदिर आहे. मंदिर आणि निसर्गरम्य परिसराच्या निमित्ताने इथे सतत लोकांची वर्दळही असते.

कृष्णाकाठच्या लोकांना पाणी आणि महापूर नवीन नाही याच्या आधीही या भागात भरपूर महापूर येऊन गेले आहेत मात्र आज अचानक आलेल्या पाण्याने मात्र टेंभू प्रकल्पाच्या पुलाला पाणी पुर्णपणे टेकले आहे. यामुळे नदीलगतच्या भागातील लोकांमध्ये भितीच वातावरणं तयार झालं आहे .

टेंभू जलसिंजन प्रकल्पाच्या पुलाला टेकले पुराचे पाणी
महाड दुर्घटनेमधील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखाची मदत

तसेच असाच पाऊस सुरु राहिला तर आणखी पुराचा धोका वाढण्याची शक्यता आहे. यामुळे परिसरातील लोकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशाराही दिला आहे.

यामुळे सर्व नागरिकांनी सतर्क रहावे आणि प्रशासनाने दिलेल्या सुचनांच पालन कराव अशा सुचनाही कोरेगांव ग्रांमपंचायत तसेच कराड पोलिस निरिक्षकांनी दिली आहे.

कराड नजीकची गावे जलमय

कराड तालूक्यातील तांबवे(Tambave) या गावामध्ये पाणी शिरले असून गावातील ग्रांपचायत आणि रहदारीच्या ठीकाणं पाण्याखाली गेली आहेत. तसेच कोयनेतून पाणी सोडले की या गावामध्ये पाणी जाणं हे समीकरणच आहे. मागील पूराच्यावेळीसुध्दा तांबवेकरांना मोठ्या संकटाला आणि नुकसानाला सामोर जावं लागलं होतं. आजच्या पुरामुळेसुध्दा तांबवेमधील दोन तीन घरे पडली आहेत. नेहमी या गावाला पुराचा धोका असतो

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com