सांगलीमधील पूरग्रस्तांचा काँग्रेस भवनावरती मोर्चा!

या मोर्चावेळी पुरात नुकसान झालेले ऊस सोयाबीन आणि भाजीपाला हातात घेऊन हा मोर्चा काढण्यात आला.
सांगलीमधील पूरग्रस्तांचा काँग्रेस भवनावरती मोर्चा!
सांगलीमधील पूरग्रस्तांचा काँग्रेस भवनावरती मोर्चा!विजय पाटील
Published On

सांगली : सांगली मधील पूरग्रस्तांना आणि शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही यासाठी पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांनी काँग्रेस भवनावरती भव्य मोर्चा काढला आहे. यावेळी पुरात नुकसान झालेले ऊस सोयाबीन आणि भाजीपाला हातात घेऊन हा मोर्चा काढण्यात आला. Flood victims in Sangli march on Congress building

हे देखील पहा-

सांगलीतील महापूर ओसरुन जवळपास दीडमहीना झाला आहे तरीही अजून कोणत्याही प्रकारची मदत सांगलीकरांना मिळालेली नाही. पूर जाऊन दीड महिना झाला मात्र आज अखेर सांगलीतील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार हे कॉंग्रेस पक्षाचे आहेत यासाठी हा मार्चा कॉंग्रेस भवनावरती काढण्यात आल्याच सांगितलं जात आहे.

सांगलीमधील पूरग्रस्तांचा काँग्रेस भवनावरती मोर्चा!
परभणी जिल्ह्यात औषध फवारणी करताना सहा शेतकऱ्यांना विषबाधा!

तसेच स्वर्गीय नेते पतंगराव कदम यांनी मंत्री असताना लगेच मदत दिली होती. मात्र आता शेतकऱ्यांना मदत करण्येची धमक एका पण मंत्र्यामध्ये नाही असा संतप्त मतही व्यक्त केले.  आज संतप्त झालेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांनी सांगलीतील स्टेशन चौक येथून मोर्चाला सुरुवात केली होती दरम्यान हा मोर्चा कॉंग्रेस भवनापर्यंत घेऊन गेले होते. दरम्यान 15 सप्टेंबर पर्यंत मदत मिळाली नाही तर हजारो शेतकरी घरातील सर्व लहान मुलांबाळांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशाराही यावेळी शेतकऱ्यांनी दिला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com