शिवसेनेच्या पोस्टरबाजीने बीडमध्ये राष्ट्रवादी घायाळ!

आमदार संदीप क्षीरसागर यांचे पाच समर्थक शिवसेनेत, प्रवेशाआधी शहरात प्रचंड बॅनरबाजी
शिवसेनेच्या पोस्टरबाजीने बीडमध्ये राष्ट्रवादी घायाळ!
शिवसेनेच्या पोस्टरबाजीने बीडमध्ये राष्ट्रवादी घायाळ!SaamTvNews
Published On

बीड : बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पाच मोहरे शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. उद्या त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. त्या अगोदर बीड (Beed) शहरात शिवसेनेने (Shivsena) अनोखी पोस्टरबाजी करत, बीडमधील राष्ट्रवादीला (NCP) घायाळ केलंय. राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे समर्थक अमर नाईकवाडे, फारुक पटेल, गंगाधर घुमरे, नितीन लोढा व प्रेमचंद लोढा हे पाच जण शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

हे देखील पहा :

उद्या माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार आहेत. शिवसेनेत प्रवेश करणार म्हटल्याबरोबर आमच्या कार्यकर्त्यांनी सर्वत्र उस्फूर्तपणे बॅनर लावले आहेत. असं नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी सांगितले. बीड नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगर सेवकांच्या गटाचे प्रमुख फारुख पटेल यांची आक्रमक विरोधक म्हणून बीड नगरपालिकेमध्ये ओळख आहे. त्याचबरोबर अमर नाईकवाडे यांचा देखील आक्रमक चेहरा आहे.

शिवसेनेच्या पोस्टरबाजीने बीडमध्ये राष्ट्रवादी घायाळ!
बीड : 10 हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचारी रंगेहाथ पकडला!

यासोबतच बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर घुमरे यांनी देखील आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांचे खंदे समर्थक म्हणून 2019 निवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. मात्र, आता आमदार झाल्यानंतर मिळणारी वागणूक यामुळे, पाचही शिलेदार आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर नाराज आहे. राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून आता हातात शिवबंधन बांधणार असल्याची चर्चा होत आहे.

शिवसेनेच्या पोस्टरबाजीने बीडमध्ये राष्ट्रवादी घायाळ!
कोरोनात मविआ सरकारने लोकांना वाचवण्याचे काम केले; काहींनी नुसते फोटो लावले - चव्हाण

बीड नगरपालिकेतील विरोधी बाकावर बसणाऱ्या नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी मागच्या दोन अडीच वर्षांमध्ये कायम बीडचे नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर जोरदार टीका केली होती. मात्र, आता ते भारतभूषण क्षीरसागर यांच्याचं नेतृत्वात काम करण्यासाठी शिवबंधन हाती बांधणार आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com