सांगलीत महापूर ओसरल्यानंतर पूर पट्ट्यात स्वच्छतेला सांगली महापालिकेने गती दिली आहे. सांगली महापालिकेच्या (SMKC) मदतीला बृहन्मुंबई (BMC), पुणे (PMC), पिंपरी (PCMC), सोलापूर (SMC) या चार महापालिकेच्या टीमसुद्धा आल्या असून 50 हुन अधिक वाहने आणि 150 कर्मचारी सांगलीच्या स्वच्छतेसाठी उतरले आहेत. (five municipal corporations are cleaning flood affected area in sangli)
हे देखील पहा -
सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 55 फुटावर गेल्यानंतर निम्मे शहर जलमय झाले होते. सोमवारपासून पुराचे पाणी ओसरण्यास सुरवात झाल्यानंतर महापालिकेकडून स्वच्छता औषध आणि धूर फवारणी हाती घेण्यात आली आहे. याचबरोबर पाणी ओसरल्यावर निर्माण झालेला राडारोडा उचलून रस्ते स्वच्छ करण्याचे कामही गतीने हाती घेण्यात आले आहे. यासाठी सांगली महापालिकेचे आरोग्य कर्मचारी स्वच्छता करत आहेतच शिवाय पुणे, मुंबई, सोलापूर, पिंपरी या महापालिकांच्या टीम स्वच्छतेसाठी दाखल होत स्वच्छता सुरू केली आहे.
सांगली शहर, सांगली वाडी, मिरजेच्या कृष्णा घाट परिसरात सुद्धा स्वच्छतेसाठी अन्य महापालिकांचे कर्मचारी काम करत आहेत. यासाठी 150 कर्मचारी आणि 50 हुन अधिक वाहने स्वच्छता कामात आहेत. यासह अन्य महापालिकांची टीमही सांगलीत येत असून सांगली शहरातील रस्ते चिखलमुक्त आणि कचरामुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.