उन्हाचा कहर; उष्माघातामुळे १३ दिवसांत पाच जणांचा मृत्यू

यंदाच्या उन्हाळ्यात उष्माघाताच्या मृत्यूची संख्या आता ९ वर पोहोचली.
Summer
SummerSaam TV
Published On

नागपूर : राज्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सुर्याच्या प्रकोपामुळे सर्वांना वाढत्या तापमानाचा सामना करावा लागत आहे. मात्र, सगळ्यात जास्त उन्हाचा तडाखा हा नागपूरात जाणवत असून नागपूरमध्ये (Nagpur) मागील १३ दिवसांत उष्माघामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर यंदाच्या उन्हाळ्यात उष्माघाताच्या मृत्यूची संख्या आता ९ वर पोहोचली आहे.

सध्या नागपूरातील उन्हाचा पारा ४५ अंशावर पोहचला असून तळपत्या उन्हामुळे उष्माघाताचा (Heatstroke) धोका आणखी वाढला आहे. तसंच जिल्ह्यात १३ दिवसांत ६१ नव्या उष्माघाताच्या रुग्णांची भर झाली असून यंदाच्या उन्हाळयात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या पोहोचली ९० च्या पुढे पोहचली आहे. त्यामुळे आता नागरिकांना दुपारच्या वेळी बाहेर पडणं देखील अवघड झालं आहे.

Summer
एकच क्लिप एकच भाषण, राज ठाकरेंवर दबाव असावा - जयंत पाटील

दरम्यान, नुकत्याचं सुरुवात झालेल्या मे महिन्यामध्ये तापमानात उच्चांकी वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवली जात असून मागील महिन्यात राज्यात जवळपास २५ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता यामधील सर्वाधिक मृत्यू हे नागपूरमधील होते. उष्माघाताच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. या रुग्णांमध्ये देखील सर्वाधिक उष्माघाताचे रुग्ण हे रुग्ण नागपूर, अकोला विभागातील आहेत. दरम्यान विदर्भासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचीही उष्णतेने होरपळ होत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com