विश्वभूषण लिमये
सोलापूर : सोलापूर Solapur जिल्ह्यातील बार्शी Barshi पंचायत समितीच्या सभापतीने एका आरटीआय RTI कार्यकर्त्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ग्रामपंचायत व पंचायत समिती कारभाराची माहिती मागवल्यामुळे गोळीबार केल्याचा आरोप सभापती अनिल डिसले यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Fires on an RTI activist at solapur
बार्शीतील वैराग Vairag येथील जोतिबाचीवाडी Jyotibachiwadi या गावात हा प्रकार घडला आहे. पंचायत समिती सभापती अनिल डिसले यांनी माहिती अधिकार कार्यकर्ता प्रमोद ढेंगळेवर गोळीबार केला आहे. २३ जून दिवशी प्रमोद ढेंगळे जोतिबाचीवाडी बस्थानकावरून आपल्या घरी जात असताना. तेव्हा वाटेत त्यांना अनिल डिसले यांनी हाक दिली व भेटण्यासाठी बोलावले. यानंतर अनिल डिसले यांनी प्रमोद यांच्या डोक्यावर रिव्हॉलवर ठेवून अश्लिल शिवीगाळ देण्यास सुरू केली.
हे देखील पहा-
मी तालुका सभापती आहे. १-२ मर्डर Murder सहज खपवू शकतो. आमदार आमचाच आहे, व पोलीस स्टेशन त्यांच्या खिश्यातच आहे. या अगोदर माझ्याविरोधात, ज्या तक्रारी दिले आहेत, त्याचे पोलिसांनी Police काय केलं आहे, ते माहिती आहे, असे म्हणत अनिल डिसले याने प्रमोद यांना मारहाण करण्यास सुरवात केली. Fires on an RTI activist at solapur
रस्त्यावरून जात असताना लहू डिसले या व्यक्तीने या दोघांच्या भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. पण, वाद काही थांबेना, यामुळे घटनास्थळावरून प्रमोद व एक स्थानिक नागरिक लहू डिसले यांनी तिथून पळ काढला. अनिल डिसलेने गोळीबार केल. प्रमोद ढेंगळे हा आपल्या घरात जाऊन लपले. यानंतर आरोपीने घरासमोर येऊन शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देण्यास सुरवात केली.
प्रमोद ढेंगळे हे ग्रामपंचायत व पंचायत समिती कारभाराची माहिती मागवली होती. या वादातूनच गोळीबार केल्याच आरोप करण्यात आले आहे. या प्रकरणी प्रमोद ढेंगळे यांनी पोलीस आयुक्तलय गाठून सदर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारी नंतर पंचायत समिती सभापती अनिल डिसले यांच्याविरोधात वैराग पोलीस स्टेशनमध्ये भादवि ३०७, शस्त्र कायदा ३ व २५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वैराग पोलीस करत आहे. Fires on an RTI activist at solapur
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.