औरंगाबाद - 2019 च्या राज्यात झालेल्या अतिवृष्टी नंतर शेतकरी Farmer बांधवांना देण्यात आलेल्या मदतीचे निकष विचारात घेता त्याच धर्तीवर मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तीन पट रक्कम मदत म्हणून तात्काळ जाहीर करून याचा हप्ता तात्काळ शेतकरी बांधवांच्या खात्यात वर्ग करावा अशी मागणी औरंगाबादचे Aurangabad पालकमंत्री सुभाष देसाई Subhash Desai यांच्या Vc द्वारे झालेल्या आढावा बैठकीदरम्यान आमदार प्रशांत बंब Prashant Bamb यांनी केली आहे.
हे देखील पहा -
एनडीआरएफच्या निकषानुसार कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रति हेक्टर 6800 तसेच बागायती क्षेत्रासाठी प्रति हेक्टर 13500 रुपये देण्याबाबत नियम करण्यात आला आहे. मात्र 2019 मधील जुलै ते ऑक्टोबर मधील अतिवृष्टी तसेच पूर बाधित व्यक्तींना मदत व्हावी या अनुषंगाने शासन मान्यतेनुसार नियमा व्यतिरिक्त तीन पट रक्कम देण्यात आली होती. यासाठी शासनाने 17 फेब्रुवारी 2020 रोजी शासन निर्णय निर्गमित करून तशा सूचना दिल्या होत्या.
याच धर्तीवर मराठवाड्यातील अतिवृष्टी धारक शेतकरी बांधवांना तात्काळ मदत घोषित करून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ती प्रत्यक्षात वर्ग कशी करता येईल याबाबत कार्यवाही करावी अशी आग्रही मागणी प्रशांत बंब यांनी पालक मंत्री महोदयांना केली आहे. हा धोरणात्मक निर्णय असून याची राज्यस्तरावर अंमलबजावणी करावी ही विनंती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांना केली आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.